• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

वृक्षसंवर्धनाचा वंजारी येथील ग्रामस्थांचा निर्धार..

जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 2, 2026
in जळगाव, Uncategorized, पर्यावरण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  :जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या पुढाकाराने धरणगाव तालुक्यातील वंजारी या गावात ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केले. बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा, करंज सारख्या स्थानिक प्रजातींची झाडांच्या रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरासह सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

शाळेचा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पुढील पिढीमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार , जैन फार्म फ्रेश फूडचे कृषीसेवक योगेश महाले यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी मनीषा साळुंखे, ग्रामपंचायत सरपंच वंदना पाटील, सदस्य नामदेव साळवे, सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, रामकृष्ण पाटील, मुकेश चौधरी, प्रल्हाद साळवे, किरण लोखंडे, विजय महाजन, ग्रामस्थ तसेच कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ, मुख्याध्यापक भिकन पाटील, संदेश शिरसाठ, पी. एस. पाटील, एस. आर. पाटील, राजेश पावरा, किरण पाटील, शुभांगी पाटील, एम. डी. अहिरे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदविला. लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी शाळा, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ संयुक्तपणे सांभाळणार असून पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावधरणगावपर्यावरण संरक्षणवंजारीवृक्षसंवर्धनवृक्षारोपण
Previous Post

‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

Next Post

कर्तत्वनिष्ठ अधिकारी कर्मचारी हेच महसूल विभागाची खरी ताकद

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

कर्तत्वनिष्ठ अधिकारी कर्मचारी हेच महसूल विभागाची खरी ताकद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif