• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

डिजिटल निमंत्रणाचा प्रयोग ठरला यशस्वी; ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

वंजारी युवा संघटनेच्या २४ व्या सत्कार सोहळ्यात विद्यार्थी, पालक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 26, 2026
in जळगाव, गौरव सोहळा
डिजिटल निमंत्रणाचा प्रयोग ठरला यशस्वी; ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चिंधू लाड (अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव), रवींद्र पोळ (सेवानिवृत्त असिस्टंट), डॉ. विजय गरकल (बऱ्हाणपूर), डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था व समस्त वंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, रवींद्र सोनवणे (मुख्याधिकारी, नशिराबाद नगर परिषद), नगरसेविका निकिता लाडवंजारी उपस्थित होते. तसेच जामनेर येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर पाटील व मुक्ताईनगरचे देवानंद वंजारी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण परिश्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि जीवनात मोठे ध्येय ठेवून यश संपादन करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे यांनी सांगितले की, “आपल्या समाजात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा होत असलेला सन्मान हा भविष्यातील यशस्वी पिढी घडविण्याचा पाया आहे. आपल्या समाजातून केवळ एक-दोन नव्हे, तर शंभर तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी घडले पाहिजेत. त्यांनी आपल्या कार्यातून जसे समाजाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले, तसेच आपल्या विद्यार्थ्यांनीही उच्च शिक्षण घेऊन विविध प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवत समाजाचा आणि देशाचा गौरव वाढवावा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा या गुणांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी व खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व प्रणाली नाईक यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची सांगड त्यांनी ओघवत्या व आकर्षक शैलीत घालत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

समारोपप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व समाजबांधवांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, डिजिटल युगाची कास धरत यंदा छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डिजिटल निमंत्रण देण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित राहिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव (भाऊ) वंजारी, सचिव महादू सोनवणे, सहसचिव उमेश वाघ, भानुदास नाईक, चंदुलाल सानप, नंदू वंजारी, रामेश्वर पाटील, विजय लाडवंजारी, संतोष घुगे, उमेश आंधळे, सुधीर नाईक तसेच वंजारी युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मनोहर काळे, जामनेर तालुकाध्यक्ष गजानन घ्यार, बोदवड तालुकाध्यक्ष अजय पाटील, मार्गदर्शक किरण वंजारी, सरचिटणीस राहुल भिसे, मार्गदर्शक प्रदीप काळे, के. डी. वंजारी, देवा वंजारी, संदीप काळे, अतुल पाडर व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

सर्व मिळून दहावी बारावी विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेले 110 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कारजळगावदहावी निकालवंजारी युवा संघटनाविद्यार्थी गौरवशिक्षण
Previous Post

भक्तिरस आणि पर्यावरण संवर्धनाचा दुहेरी संदेश ; आषाढी एकादशी व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

Next Post

जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड..

जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif