नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगांव : जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे लोकप्रिय कर्तुत्ववान व गतीशील नेतृत्व सुनिल भंगाळे यांची आज दि.२६ जुलाई रोजी केमिस्ट भवनात आयोजित जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केमिस्ट सभासदांच्या आग्रही भूमिकेने एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.समवेत उपाध्यक्ष पदी संदीप बेदमुथा तर कोषाध्यक्ष पदी दिनेश मालू यांचीदेखील निवड करण्यात आली.या निवड प्रसंगी भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा पारोळा, अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.पुढील ३ वर्षा साठी ही निवड झाली आहे .
मागील २५ ते ३० वर्षापासून वर्षापासून विविध पदांवर अखंड कार्यरत राहून जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या नेतृत्वाची धुरा कौशल्याने सांभाळणारे,कर्तृत्वाचा आगळा वेगळा इतिहास निर्माण करणारे सुनिलभाऊ यांनी आपल्या आत्मिक सेवा कार्यातून परिवर्तनाचा मूलमंत्र देत जळगाव जिल्हा केमिस्ट हित जपण्यासाठी केमिस्ट हृदय सम्राट आप्पा साहेब जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या विचारानुसार जीवाचे रान करून समाजातील प्रत्येक क्षेत्रात संघटनेचे कार्य पोहचवून नावलौकिक प्राप्त केला आहे.अहर्निश सेवामये या उक्ती प्रमाणे काम करून आपल्या डायनॅमिक व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे.
सचिव अनिल झंवर व इतर पदाधिकाऱ्यांची विश्वासू साथ ,केमिस्ट सदस्यांचा अतूट विश्वास या मुळे बेधडक कार्यशैली तील त्यांच्या धाडसी स्वभाव, उत्तम निर्णय शक्ती ,दांडगा जनसंपर्क ,अनेक सेवाभावी समाज उपयोगी संघटनात्मक तसेच सामाजिक उपक्रम राबवून व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य, केमिस्ट बांधवांच्या पाठीशी अडी अडचणी सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध अश्या आदर्श सेवा भावी कार्यातुन बहुगुणी व्यक्तिमत्व निर्माण झाल्याने केमिस्टचा बहुमान वाढवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
जिल्ह्यासह राज्य पातळीवर त्यांच्या तेजस्वी कार्याचा गौरव होवून अनेक पुरस्कारांनी उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा सन्मान झाला आहे.आता पुढील तीन वर्षाच्या वाटचाली साठी केमिस्ट बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.







