• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बारी समाज एकवटला!

मेहंदी, प्री-वेडिंग शूट, बॅनरबाजी आणि रात्रीच्या डीजेवर निर्बंध; साधेपणा व संस्कार जपण्याचा निर्धार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 10, 2026
in जळगाव ग्रामीण, Uncategorized, सामाजिक
समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बारी समाज एकवटला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

(संतोष ताडे शिरसोली ) 

 शिरसोली  (प्रतिनिधी ) : शिरसोली प्र.न. व शिरसोली प्र.बो. येथील सूर्यवंशी बारी पंच मंडळाच्या नेतृत्वाखाली समाजातील वाढत्या अनिष्ट, खर्चिक आणि सामाजिकदृष्ट्या घातक प्रथांवर नियंत्रण आणण्यासाठी विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिरसोली प्र.बो. येथील बारी भवनात पार पडलेल्या या बैठकीत समाजहिताच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

समाजात साधेपणा, संस्कार, आर्थिक बचत आणि सामाजिक शिस्त टिकवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लग्न समारंभातील वाढता अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि काही चुकीच्या परंपरांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

बैठकीत लग्नपत्रिकेत दिलेल्या मुहूर्तावरच विवाह लावणे, दोन वेळा विवाह सोहळे टाळणे, मेहंदी कार्यक्रम आणि प्री-वेडिंग शूट बंद करणे, लग्नातील बॅनरबाजी थांबवणे, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करणे टाळणे, साखरपुड्याऐवजी नारळवाटीची प्रथा सुरू करणे तसेच रात्री उशिरापर्यंत डीजे किंवा बँड न वाजवता मर्यादित वेळेत कार्यक्रम पूर्ण करण्यावर एकमत झाले.

बैठकीत ठरविण्यात आलेल्या आचारसंहितेचे पालन सर्व समाजबांधवांना बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, ऐनपूर, भुसावळ, सोयगाव, आमखेडा, शेंदूर्णी, पहूर, कुऱ्हा पानाचे, जळगाव, पिंप्राळा, हरिविठ्ठल नगर, बऱ्हाणपूर, शहापूर, बंभाडा, अंतुर्ली, वालसावंगी, पारध, धामणगाव, वाघोड, चापोरा, शिरपूर आणि नंदुरबार येथील पंच मंडळांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.

रतन फुसे (पीआय, पारोळा) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. समाजात एकोपा टिकवून पुढील पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत एकमताने मंजूर झालेले प्रमुख निर्णय

वेळेवर लग्न लावणे

लग्नपत्रिकेत दिलेल्या मुहूर्तावरच विवाह सोहळा पार पाडणे

मेहंदी कार्यक्रम बंद करणे

प्री-वेडिंग शूटिंग बंद करणे

लग्नातील बॅनरबाजी थांबवणे

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करणे टाळणे

साखरपुड्याऐवजी नारळवाटीची प्रथा सुरू करणे

रात्री डीजे/बँड न वाजवता मर्यादित वेळेत कार्यक्रम पूर्ण करणे

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातम्याप्री वेडिंग शूटबारीबारी समाजलग्न समारंभ नियमशिरसोलीसमाज सुधारणा
Previous Post

आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !

Next Post

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप!

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif