• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !

पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याचे महापौरांचे निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 10, 2026
in जळगाव, महापालिका
आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : आहुजा नगर परिसरातील मनुदेवी हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या ओपन स्पेस संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. ९ जून) महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

वारंवार तक्रारी करूनही झाले होते दुर्लक्ष

मनुदेवी हाउसिंग सोसायटी परिसरातील या ओपन स्पेसची लेव्हल खाली असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या मूलभूत सुविधेबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे गंभीर दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर त्रस्त नागरिकांनी या समस्येबाबत थेट महापौर दीपमाला काळे यांच्याकडे दाद मागितली होती.

वेस्ट मटेरियल टाकून लेव्हल करण्याचे निर्देश

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी मंगळवारी या परिसराला भेट दिली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर, या ठिकाणी पावसाचे पाणी जमा होते आणि ते वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर तातडीने तोडगा म्हणून, “या ओपन स्पेसमध्ये वेस्ट मटेरियल (भराव) टाकून लेव्हल करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

“आगामी पावसाळ्यात येथील नागरिकांना पाण्याचा कोणताही त्रास होणार नाही, याची महापालिका प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी.”

— दीपमाला काळे, महापौर

या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेचे अभियंता विशाल सुर्वे, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर यांच्यासह महापालिकेचे इतर संबंधित अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: आहूजा नगरओपन स्पेसजळगावजळगाव महापालिकादीपमाला काळेपावसाचे पाणी
Previous Post

जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती

Next Post

समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बारी समाज एकवटला!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बारी समाज एकवटला!

समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बारी समाज एकवटला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 19, 2026

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif