• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खडतर संघर्षातून भावेश पाटील भारतीय सैन्यात अग्निवीर!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जळगावच्या युवकाची अग्निवीर म्हणून निवड; जिद्द आणि मेहनतीचे उज्ज्वल यश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 11, 2026
in जळगाव, करिअर
खडतर संघर्षातून भावेश पाटील भारतीय सैन्यात अग्निवीर!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील १८ वर्षीय भावेश अशोक पाटील याने भारतीय सैन्य दलातील अग्निवीर (आर्टिलरी सेंटर, हैदराबाद) मध्ये निवड मिळवून कुटुंबासह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या भावेशने लहानपणापासूनच कष्टाची तयारी ठेवली. शिक्षण घेत असतानाच तो गणपती ॲड एजन्सीमध्ये काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे पूर्ण केले असून सध्या बारावी (गणित शाखा) चे शिक्षण घेत आहे.

लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आलेल्या संकटांवर मात करत त्याने आई, आजी-आजोबा यांच्या कष्टांची जाणीव मनात ठेवून सैन्यात भरती होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि अथक मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय सैन्यात स्थान मिळवले.भावेश १ जुलै रोजी प्रशिक्षणासाठी आर्टिलरी सेंटर, हैदराबाद येथे रवाना होणार आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रामेश्वर कॉलनीसह संपूर्ण जळगाव शहरातून त्याचे अभिनंदन होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भावेश हा गणपती ॲड एजन्सीचे मार्केटिंग प्रतिनिधी सागर पाटील यांचा लहान भाऊ असून त्याच्या यशामुळे पाटील कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अग्निवीरजळगावप्रेरणादायीभारतीयसैन्ययशोगाथासंघर्षातून
Previous Post

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

Next Post

एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!

एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif