• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात नाल्यात विषारी रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त; दुर्गंधी व प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 29, 2026
in जळगाव, समस्या
जळगावात नाल्यात विषारी रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील लक्ष्मी नारायण नगर कॉलनी परिसरात, अयोध्या नगरच्या मागील भागातील नाल्यात पुन्हा एकदा रासायनिक व तेलयुक्त पाणी सोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या घटना चार ते पाच वेळा घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त

नाल्यात सोडलेल्या रासायनिक पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून पाण्याचा रंगही बदललेला दिसत आहे. या प्रदूषणामुळे हवा आणि पाणी दोन्ही दूषित होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

नगरसेवकांचा प्रशासनाला इशारा

या प्रकरणाची दखल घेत नगरसेवक विरेन खडके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली.

“नागरिकांच्या आरोग्याशी कुठलाही तडजोड होऊ देणार नाही. दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर नागरिकांसह आंदोलन छेडू,” असा इशारा त्यांनी दिला.

नागरिकांची नाराजी, ठोस उपाययोजनेची मागणी

स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला. “यामुळेच अशा घटना पुन्हा घडत आहेत,” असे नागरिकांनी सांगितले. त्यांनी महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घ्यावी

या घटनेमुळे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शहरातील नाले व जलस्रोत सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य धोक्यातकारवाईची मागणीकेमिकलकेमिकल युक्त पाणीजळगावनागरिकनागरिक संतप्तनालाप्रदूषणप्रदूषणप्रशासनविषारी पाणी
Previous Post

‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Next Post

ख्वाजामिया झोपडपट्टीच्या जागेवर २०० कोटींचा घोटाळा?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ख्वाजामिया झोपडपट्टीच्या जागेवर २०० कोटींचा घोटाळा?

ख्वाजामिया झोपडपट्टीच्या जागेवर २०० कोटींचा घोटाळा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif