• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगाव किंग्स सर्वांधिक फ्रँचायझी, ओम मुंडे महागडा खेळाडू..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 28, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव दि.२८  – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20 पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली. ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला. प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली.

 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग – २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’ जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंटस, जामनेर ब्लास्टर, पाचोरा टायटन्स हे संघ ‘ऑक्शन’ मध्ये निश्चित झाले. ‘ऑक्शन’ मध्ये सहभागी झालेल्या संघ मालकांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला. या पर्वात जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे, हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून त्यांची बोली लावली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

 

*संघ व मालकांची माहिती*

 

*जळगाव किंग्स* – फ्रँचायझी मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा

प्रशिक्षक : घनश्याम चौधरी

आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे

 

*चाळीसगाव चार्जर्स* – फ्रँचायझी मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब

प्रशिक्षक : सचिन सोनवणे

आयकॉन खेळाडू : ओम मुंडे

 

*रावेर रॉयल्स* – फ्रँचायझी मालक : सीए महावीर जैन

प्रशिक्षक : तनवीर अहमद

आयकॉन खेळाडू : नचिकेत ठाकूर

 

*अमळनेर जायंट्स* – फ्रँचायझी मालक : सुहांस केमिकल्स, संदीप काबरा

प्रशिक्षक : राहुल निंभोरे

आयकॉन खेळाडू : शुभम शर्मा

 

*पाचोरा टायटन्स* – फ्रँचायझी मालक : एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी

प्रशिक्षक : पंकज महाजन

आयकॉन खेळाडू : सचिन चौधरी

 

जामनेर ब्लास्टर्स – फ्रँचायझी मालक : रमेशदादा जैन

प्रशिक्षक : मुश्ताक अली

आयकॉन खेळाडू : शतायू कुलकर्णी

 – जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये ऑक्शनप्रसंगी ऑयकॉन खेळाडू, प्रशिक्षक व फ्रॅंचायझी मालक.

बातमी शेअर करा !
Tags: JCL2026ओममुंडेक्रिकेटऑक्शनजळगावक्रिकेटलीगजळगावस्पोर्ट्सजेसीएलटी२०लीगस्थानिक क्रिकेट
Previous Post

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’ ३१ मार्च शेवटची मुदत 

Next Post

जळगावात नाल्यात विषारी रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात नाल्यात विषारी रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप

जळगावात नाल्यात विषारी रासायनिक पाणी; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif