नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – के सी ई इंजिनिअरींग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयांत महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती. निमित्त लक्षात घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
पॉलिटेकनिक विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .शिवजयंती निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन प्रा.राहुलकुमार पटेल ,ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा गणेश पाटील , आय क्यू ए सी समन्व्यक प्रा कल्पेश महाजन , प्रा.अविनाश सूर्यवंशी , पॉलिटेकनिक विभागाचे समन्वयक प्रा बी जे लाठी,प्रा के पी अकोले, विभाग प्रमुख प्रा.जगदीश पाटील ,प्रा अर्चना शेवाळे ,प्रा पूजा अडवाने ,प्रा.स्नेहल पवार, सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले . ‘जय भवानी ,जय शिवाजी ‘या घोषणेने महाविद्यालयांतील सर्व वातावरण शिवमय झाले .
शिवजयंती कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या भाषणात शिवचरित्र सांगताना महाराजांच्या लहानपणापासून त्यांना स्वराज्याचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांचे कडून कसे मिळाले ते सांगितले सध्या परीस्थितीत युवकांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले गुण व नेतृत्व स्वतःमध्ये अंगिकारण्याची गरज आहेत .तसेच त्यांनी अष्टप्रधान मंडळ व व्यवस्थापन यावर उदाहरणासहित स्पष्टीकरण केले . त्यात पॉलीटेकनिक च्या विदयार्थ्यांनी शिवजन्मोत्सव व विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर केले . या निमित्ताने ढोल ताशा व् लेझीम पथकाने मिरवणुकीमध्ये शानदार वादन करून उपस्थितांचे लक्ष वेधले .
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भगवे ध्वज फडकवत मिरवणुकीत सहभाग नोंदवला . ढोल ताश्याच्या आवाजाने वातावरण भारावुन गेले होते . शिवप्रेमींनी मोठया संख्येने शिवजयंती सोहळयाला उपस्थिती लावली . कार्यक्रमाचे आयोजन प्रा जगदीश पाटील यांनी केले .







