• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर शनिवारी उद्घाटन सोहळा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 17, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

जळगाव दि.१७ प्रतिनिधी – जळगावकरांमध्ये क्रिकेटचा उत्साह दिसत असून हा जल्लोष प्रत्यक्ष मैदानावर झळणार आहे.. दमदार खेळाडूंचा खेळाला प्रोत्साहन देण्याऱ्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६ चा महा-थरार हा दि.१८ ते २६ एप्रिल दरम्यान मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस येथील भव्य क्रीडांगणावर अनुभवता येणार आहे.

उद्या दि. १८ रोजी संध्याकाळी भव्य उद्घाटन सोहळा होईल. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाचोरा आमदार किशोर पाटील, चाळीसगाव आमदार मंगेश चव्हाण, रावेर आमदार अमोल जावळे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांची विशेष उपस्थिती असेल.

त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जेसीएल व्यवस्थापनाचे सुयूश बुरकूल, अभंग जैन, अॅड. सुरज जहॉंगीर, हितेश पटेल, समीर गुळवे, प्रशांत विरकर, रवींद्र धर्माधिकारी, जगदीश चावला, वरुण देशपांडे, उदय सोनवणे, बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी, संदीप चव्हाण, संदीप गांर्गुेडे, मंगेश नार्वेकर, वैभव हलदे, संतोष बडगुजर, संदीप जरे व मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. त्यांच्यासोबत सर्व संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित असतील.

सहा टीम, सहा प्रशिक्षक १०८ खेळाडू

जळगाव कोगटा किंग संघ मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, आयकॉन खेळाडू जगदीश झोपे, प्रशिक्षक घनश्याम चौधरी, जामनेर सातपूडा हिरोज् संघ मालक किरण बच्छाव, आयकॉन खेळाडू शतायू कुलकर्णी, प्रशिक्षक मुस्ताक अली, पाचोरा एसकेटी योद्धाज संघ मालक हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, आयकॉन खेळाडू सचिन चौधरी, प्रशिक्षक पंकज महाजन, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंर्ज्स संघ मालक सागर पार्क क्रिकेट क्लब, आयकॉन खेळाडू ओम मुंडे, प्रशिक्षक सचिन सोनवणे, रावेर रॉयल्स संघ मालक सीए महावीर जैन, विमल जैन, अखिल बनवट आयकॉन खेळाडू धवल हेमनानी, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अमळनेर सुहांस जायंटस संघ मालक संदीप काबरा, श्रेयांस काबरा, आयकॉन खेळाडू शुभम शर्मा, प्रशिक्षक राहूल निंभोरे अशा सहा टीम व १०८ खेळांडूंमध्ये जळगाव क्रिकेट लिगचा महाकुंभ रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवरील सर्व नियमावलीने होणाऱ्या या स्पर्धेचे गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल, साद शेख, तौकिर रजा, मनिष चौबे हे काम करतील.

जैन ड्रीम स्पेसेस चे मैदान विजयांच्या स्वप्नांसाठी सजले..

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगेल. लीग मॅचेच मध्ये प्रत्येक टीम पाच सामने एकमेकांशी खेळेल. त्यानंतर क्लालिफायर व एलिमेंटर सामने झाल्यानंतर ग्रॅण्ड फायनल होईल. एकूण १९ सामन्यांमधून चौकार, षटकारांसह गुगली, यॉर्कर, बॉउन्सरची धमाल बघायला मिळणार आहे. कांताई नगर जैन ड्रीम स्पेसेस येथील क्रीडांगणावरील ट्रप्फ विकेट सज्ज झाली आहे. हिरवळीच्या सुसज्ज लॉनसह मैदानाच्या बाऊंडरी ह्या एलईटी स्क्रीन ने लावण्यात आल्या आहेत. दिवस रात्रीच्या सामन्यांसाठी विशेष एलईडी लाईटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीमधील स्टेडियमचा लुक जैन ड्रीम स्पेसेस च्या क्रीडांगणावर अनुभवता येईल, यासाठी प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. ती सर्वांसाठी खुली असेल.

*असे रंगतील सामने..*

दि. १८ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. १८ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स विरूद्ध जळगाव कोगटा किंग.

दि. १९ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग.

दि. १९ एप्रिल सायंकाळी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयर्ल्स.

दि. २० एप्रिल सकाळी ८.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

दि. २० एप्रिल दुपारी ३ वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. २० एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.

दि. २१ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध रावेर रॉयल्स.

दि. २१ एप्रिल दुपारी ३ वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.

दि. २१ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २२ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

दि. २२ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २२ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

दि. २३ एप्रिल दुपारी ३ वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

दि. २३ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.

दि. २४ एप्रिल दुपारी ३ क्लालिफायर-१

दि. २४ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला एलिमेंटर

दि. २५ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला क्लालिफायर-२

दि. २६ एप्रिल सायंकाळी ७.३० ग्रॅण्ड फायनल

बातमी शेअर करा !
Tags: क्रिकेट स्पर्धाक्रिकेटप्रेमीक्रिकेटफिव्हरजळगावक्रिकेटलीगटी २० लीगस्थानिक क्रिकेट
Previous Post

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

Next Post

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif