• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

द्वि तपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाची रसिकांना मेजवानी

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाचे आयोजन ; छत्रपती राजेसंभाजी नाट्यगृहात रंगणार दि. 9 10 11 रोजी महोत्सव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 14, 2025
in Uncategorized, जळगाव, महाराष्ट्र, संगीत महोत्सव
द्वि तपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाची रसिकांना मेजवानी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्युज नेटवर्क

जळगाव – भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. २४ या अर्थात द्वितपपूर्ती महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते १९ या वेळेत संपन्न होणार आहे. सन २०२५-२६ हे वर्ष प्रतिष्ठानाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून प्रतिष्ठान साजरं करीत आहे. अशी माहिती स्व.वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर ते कांताई सभागृह येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते यावेळी , विवेकानंद कुलकर्णी,अरविंद देशपांडे, नुपर खटावकर, अनुश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २४ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., व संस्कृती मंत्रालय भारत सरकार असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रा. लि. होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आलेले आहे

 

महोत्सवाची सुरुवात दि ९ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभा नंतर होईल प्रथम सत्रात तरूण पिढिचे प्रतिनिधित्व करणारी मुळची आसामची असलेली व सध्या मुंबईत स्थानिक एक अत्यंत गुणी व प्रतिभासंपन्न गायिका श्रृती बजरबरुहा हिच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. तिला अभिनय रवंदे संवादिनीवर तर रोहित देव तबल्यावर साथसंगत करतील, द्वितीय सत्रात जागतिक किर्तीचे सतार वादक चिराग कुट्टी आपले सतार वादन सादर करतील त्यांना तबल्याची साथ अमेरीकेत स्थानिक असलेले विवेक पंड्या करतील,

 

द्वितीय दिनाच्या प्रथम सत्रात मुंबईचे जगविख्यात सारंगी वादक व उस्ताद सुलतान खान यांचे चिरंजीव उस्ताद साबीर खान आपले सारंगी वादन सादर करतील त्यांना तबल्यावर साथ संगत विवेक पंड्या करतील.

 

द्वितीय सत्र मुंबई ची प्रख्यात कथक नृत्यांगना निधी प्रभू व सुप्रसिध्द फ्लेमिंको नृत्यकार कुणाल ओम यांच्या कथक-फ्लेमिको जुगलबंदीने संपन्न होईल त्यांना तबला संगत रोहित देब, काहोन व तबला विनायक गवस, संवादिनी थ गायन श्रीरंग टेंबे हे करणार आहेत.

 

तृतीय दिनाचे प्रथम सत्र प्रख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने होईल त्यांना तबला साथ तेजोवृष जोशी व संवादनि साथ अभिनय रवंदेकरणार आहेत.

नादस्वरम्, तावील व मृदुंग याचे सहवादन. या कॉन्सर्ट चे शिर्षक आहे कॅर्नाटिक क्वॉर्टेट आंतराष्ट्रिय ख्याती प्राप्त कलावंतांचा सहभाग या सहवादनात्त असणार आहे हे सहबादन श्रेया देवनाथ (इलेक्ट्रिक व्हायोलीन) एम कार्तिकेयन (नादस्वरम्) प्रविण स्पर्श (मृदुंगम्) गुम्मीडिपौंडी जीवा (तबिल) सादर करतील.

 

स्थानिक कलावंतांना सादरीकरणाची संधी ..

 

जळगावच्या नुपुर खटावकर सह कोमल चौहान, हेतल चौहान, साक्षी माळी, स्नेहल फडके, तनया पाटील हे कलाकार गणेश वंदना सादर करणार आहेत.

तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून या तीनही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे. प्रवेशिकेसाठी दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्र. ९८२३०७७२७७ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: #DrBabasahebAmbedkar #MahaparinirvanDin #AmbedkarThoughts #ConstitutionDay #CharacterReadingSession #SchoolEvent #EducationNews #JalgaonNews #SantDnyaneshwarVidyalay #StudentActivity
Previous Post

उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण…

Next Post

निमखेडीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
निमखेडीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

निमखेडीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif