• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण…

श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहाय्य.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 13, 2025
in Uncategorized, जळगाव, विशेष बातमी, सामाजिक
उडानच्या दिव्यांग मुलांसाठी सूत कताईचे प्रशिक्षण…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव –  गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे.

 

रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे संचालन केले जाते. या केंद्रातील मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन यांच्यासमवेत दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालिका हर्षाली चौधरी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई तसेच बरुन मित्रा उपस्थित होते.

प्रास्ताविकात गांधी रिसर्च फाउंडेशनचे शैक्षणिक अधिष्ठाता डाॅ. अश्विन झाला यांनी केले. ज्योती जैन यांचे स्वागत गायत्री भालेराव, दीपाली सुरळकर यांनी त्यांच्या हस्तनिर्मित पुष्पगुच्छाने केले. हर्षाली चौधरी यांचे स्वागत अनिता यादव यांनी केले. तर अब्दुल भाई यांचे स्वागत समीर कोल्हे, कुणाल कोल्हे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

उद्घाटनानंतर गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी दिव्यांग मुलांना चरखा चालवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संचालिका हर्षाली चौधरी यांनी सांगितले की, “आमची मुले लवकरच सूत कताईत प्राविण्य मिळवतील, याची मला खात्री आहे.” गांधी विचार संस्कार परिक्षेचे गिरीश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून डोके-हृदय-हात यामधील समन्वय वाढेल. या उपक्रमातून रोजगार निर्मिती होऊन मुले स्वावलंबी होतील. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील, दीपक मिश्रा, अजय क्षीरसागर, मयूर गिरासे, अनिलेश जगदाळे, सागर टेकावडे, भूषण अस्वार, सागर पाटील, प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

सूत प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ करताना ज्योती जैन. सोबत अब्दुल भाई, हर्षाली चौधरी, बरुन मित्रा.

बातमी शेअर करा !
Previous Post

Next Post

द्वि तपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाची रसिकांना मेजवानी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
द्वि तपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाची रसिकांना मेजवानी

द्वि तपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाची रसिकांना मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif