काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, जळगाव येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व दलित साहित्याचे अभ्यासक डॉ.अ. फ. भालेराव यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले व विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग व गोष्टी सांगून मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व भिमगीत गायन स्पर्धा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांन मुख्याध्यापक एस. डी. खडके यांनी भुषविले यावेळी उपमुख्याध्यापक व्ही. आर. कोल्हे, जेष्ठ शिक्षक सी. व्ही. येवले, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख बी.बी. देवरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार के. सी. राठोड यांनी केले. पाहुण्याचा परिचय व्ही. एस. निंभोरे यांनी केले. तसेच वक्तृत्व व भिमगीत गायन स्पर्धेचे परिक्षण एम. एस. वाघुळदे व एम.ए. कोल्हे यांनी केले.







