• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

बारी ताईने परत केली १५ ग्राम सोन्याची अंगठी

शिरपूरात प्रामाणिकपणाचे दर्शन ; प्रियंका बारी यांनी ठेवला समाजापुढे आदर्श

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 24, 2025
in सामाजिक, धुळे
बारी ताईने परत केली १५ ग्राम सोन्याची अंगठी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरपूर (प्रतिनिधी) स्वार्थ, फसवणूक आणि बेईमानीने भरलेल्या आजच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सद्भावना हरवत चालल्या आहेत, असं वाटत असतानाच शिरपूरच्या एका महिलेने आपली नितीमत्ता दाखवत समाजाला नवा प्रकाश दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी शहरात प्रसिद्ध कथा वक्ते प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा रंगली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत अध्यात्माचा भारावलेला माहोल तयार झाला होता. अशा गर्दीत हाॅटेल केतनचे मालक सुनील सुरेश चौधरी यांची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी कुठेतरी हरवली. ही अंगठी केवळ दागिना नव्हता, तर त्यांच्यासाठी खास भावना जोडलेला एक मौल्यवान स्मृतिचिन्ह होता. अशा वेळी, प्रियंका भूषण बारी या महिलेला ही अंगठी सापडली. एका क्षणात त्या अंगठीच्या किंमतीचा मोह मनात येणं साहजिक होतं. पण त्यांनी मोहाचा मार्ग न निवडता, प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवीत अंगठी मूळ मालकास परत केली.

अंगठी परत करताना प्रियंका म्हणाल्या, “ही अंगठी माझ्या हाती आली, ते फक्त योगायोग. पण ती माझी नव्हती. जी वस्तू आपली नाही, तिला ठेवून मिळणारं सुख कधीच खरं समाधान देत नाही.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांची मनं हेलावली.

या प्रसंगी कथेचे प्रमुख मोहनजी हुलेसींगजी पाटील, प्रशांत राजाराम बडगुजर, अविनाश पवार, किरण जैन, भूषण गजानन बारी, नलिनी गजानन बारी आणि गोरख पुना बारी यांनी प्रियंका यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिच्या प्रामाणिकतेचं स्वागत केलं. ही घटना एक छोटीशी वाटू शकते, पण यातून दिला गेलेला संदेश मोठा आहे. या स्वार्थी जगात अजूनही अशी माणसं आहेत जी आपल्या नीतिमत्तेच्या मूल्यांवर ठाम आहेत. प्रियंका बारी यांची ही कृती केवळ अंगठी परत करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आजच्या तरुण पिढीसाठी एक दीपस्तंभ ठरावी अशीच आहे. शेवटी एवढंच सोन्याची अंगठी हरवली, पण त्या निमित्ताने सोन्यासारखं मन लाभलेली व्यक्ती समाजासमोर आली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

बातमी शेअर करा !
Previous Post

मुंबईतील जोगेश्वरीतील इमारतीला भीषण आग

Next Post

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif