• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

तरूणींच्या साहसाला सलाम…

युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालयाच्या गोपिका पथकाला

NAVARAJY TEEM by NAVARAJY TEEM
August 17, 2025
in Uncategorized
तरूणींच्या साहसाला सलाम…   
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

सागर पार्कवर चित्तथरारक कसरतींसह शौर्यवीर, वज्रनाथ, पेशवा ढोलपथकांतील ४१५ वादकांवर युवतींचा जल्लोष

जळगाव  प्रतिनिधी – रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांतून जळगावच्या गोपिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषपूर्ण वातावरणात गोपिकांचे मानवी मनोरे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. अखेर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय या गोपिकांच्या पथकाने मिळविला.‌ त्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरच्या गौरविण्यात आले.

 

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) वर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, जिल्हा परिषदेच्या सिईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँक चे संचालक अरविंद देशमुख, गोदावरी फाऊंडेशन च्या डॉ. केतकी पाटील, युवतींच्या दहिहंडी समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी नागूलकर, प्रा.शमा सराफ, निलम जोशी, अनिता पाटील, यामिनी कुळकर्णी, सोनाली महाजन, चेतना नन्नवरे, लिना पवार, डॉ. हेमांक्षी वानखेडे, श्रीया कोकटा यांच्यासह पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला दहिहंडी पूजन करण्यात आले. दरम्यान दहिहंडी फोडणाऱ्या गोपिकांच्या पथकाला चषकाने सन्मानित करण्यात आले. यासोबतच इतर सहभागी झालेल्या संघानासुद्धा गौरविण्यात आले. यावेळी छाया बोरसे, मंजुषा भिडे, कामिनी धांडे, छाया चिरमाडे या परीक्षकांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

महाराष्ट्रात एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या सागर पार्क झालेल्या सोहळ्याप्रसंगी मूख्य व्यासपीठासह तीन अन्य व्यासपीठाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघातील सुमारे ५०० गोपिकांनी सहभाग घेतला.

*जळगावकरांची प्रचंड गर्दी…
गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे 415 वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून परिसर दणाणून गेला होता. यावर्षी उत्सव पाहण्यासाठी जळगावकरांनी प्रचंड गर्दी करुन गोपिकांचा उत्साह वाढविला.

गोपिकांची अकरा पथके

गोपिंकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके आली होती. या पथकामध्ये किडस् गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. या पथकांचा समावेश होता.
युवाशक्ती फाऊंडेशन चे विराज कावडिया यांच्यासह पदाधिकारी व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन चे सहकारी यांनी यशस्वी ते साठी सहकार्य केले. अय्याज मोहसीन यांनी संचालन केले.

 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जनशताब्दी निमित्त कतृत्वान महिल्याच्या सन्मानार्थ राजेश नाईक यांच्या संकल्पेतुन विशेष सजावट करण्यात आली होती. सोफिया कुरेशी, व्योमा सिंग, प्रेरणा देवस्थळी ,दिव्या देशमुख, दिपा मलिक, राही पाखले, टेसी थामस, वंतिका अग्रवाल, गीता गोपिनाथ यांच्या कार्यातुन प्रेरणा मिळावी यासाठी दहिहंडी त विशेष स्थान देण्यात आले.

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .

Next Post

देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव

Next Post

देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

November 30, 2025
समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

November 29, 2025
ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

November 29, 2025
राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

November 28, 2025
उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

उद्योजकअल्पेश देवरेंनी दिल्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतीभेट

November 27, 2025
संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

November 26, 2025
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif