• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

५ हजार शाळांपर्यंत पोहचणार; जैन हिल्सला झालेल्या बैठकीत २० जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 1, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त सहकार्याने पुढील पाच ते दहा वर्षात ५ हजार शाळांपर्यंत ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम राबविला जाईल. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीत याबाबतचे उद्दिष्ट ठरले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले हे व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ‘चेस इन स्कूल’ या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. या बैठकीत राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

२००८ पासून अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज संघटना देशातील अग्रगण्य संघटनांपैकी एक बनली आहे. राज्यातील ३३ जिल्हे संघटनेशी संलग्न आहेत. गेल्या आठ, दहा वर्षांपासून मागे पडलेला ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम अशोक जैन, अतुल जैन यांच्या पुढाकाराने आज पुन्हा सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनासाठी जैन इरिगेशन, जैन स्पोर्टस् अकॅडमीने पुढाकार घेतल्याबद्दल अशोक जैन व अतुल जैन यांचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे आभार व्यक्त करून अशोक जैन यांचा अभिजीत कुंटे यांनी तर अतुल जैन यांचा चेस इन स्कूल उपक्रमाचे सचिव विलास म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘चेस इन स्कूल’ लोगोचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमाची पहिली शाळा ही अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन ठरली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बुद्धिबळाचे साहित्य देण्यात आलीत ती प्राचार्य मनोज परमार सह शाळेतील सहकाऱ्यांनी स्वीकारली.

खेळाडू घडविणे हेच ध्येय – अशोक जैन

उपस्थितांशी अशोक जैन यांनी संवाद साधला, बुद्धिबळाशी माझा अभिजीत कुंटे यांच्यामुळे संबंध आला. सुरुवातीपासूनच पक्ष, धर्म, समाज आणि व्यावसायिक भेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन बुद्धिबळाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. खेळात राजकारण नको, तर खेळाडू घडविणे हेच आपले ध्येय असावे. ‘चेस इन स्कूल’ हा उपक्रम महाराष्ट्रातील बुद्धिबळ विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आर्थिक, मनुष्यबळ व संघटनात्मक सहकार्य देऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आमची तयारी आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राने तमिळनाडूपेक्षा अधिक प्रगती करावी, हे आपले ध्येय असावे. हीच आपली भूमिका असली पाहिजे असेही ते म्हणाले.

‘चेस इन स्कूल’ उपक्रम मिशन मोडवर राबविणे – अतुल जैन

‘चेस इन स्कूल’ उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याबद्दल अतुल जैन म्हणाले की, महाराष्ट्र बुद्धिबळ क्षेत्र प्रगतीवर आहे. अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रॅण्डमास्टरची संख्या दोनवरून १४ पर्यंत पोहोचली, तर महिला खेळाडूंच्या कामगिरीतही उल्लेखनीय वाढ झाली. ‘चेस इन स्कूल’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सुरुवातीला दहा शाळा सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम मिशन मोडवर राबविणे आवश्यक असल्यांचे अतुल जैन म्हणाले.

चौकट..

नव्या पिढीसाठी बुद्धिबळ अत्यंत प्रभावी…

आजच्या वेगाने बदलणाऱ्या एआयच्या युगात नव्या पिढीची विचारक्षमता, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी बुद्धिबळ हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते. खेळातून टीमवर्क, कौशल्य, पराभव स्वीकारण्याची ताकद आणि विजयात नम्र राहण्याचे संस्कार रुजतात. विशेषतः तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करून त्याचा पाया शाळास्तरावर भक्कम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

फोटो कॅप्शन –

(_DSC0524) – ‘चेस इन स्कूल’ उपक्रमाची सुरवात करताना अशोक जैन, अतुल जैन, अभिजीत कुंटे, निरंजन गोडबोले, विलास म्हात्रे, चिंदबर किटी भास्कर, राजेंद्र कोंडे, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे यांच्यासह विविध जिल्ह्यामधील प्रतिनिधी.

बातमी शेअर करा !
Tags: अतुल जैनअभिजित कुंटेअशोक जैनचेस इन स्कूलनिरंजन गोडबोलेमहाराष्ट्र बुद्धिबळ संघटना
Previous Post

लोहारात शेती साहित्य चोरीच्या घटनेने शेतकरी चिंतेत!

Next Post

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील - केंद्रीय मंत्री सेठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif