• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षा चालकास मारहाण प्रकरण ; ॲड. अनिकेत निकम यांची जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव; कठोर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 15, 2026
in जळगाव, Uncategorized
रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा ‘न्याय विश्वास फाउंडेशन’चे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी मारहाण झालेल्या एका रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. पीडित रिक्षाचालकाला सोबत घेऊन त्यांनी थेट जळगाव शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसांसमोर त्याची बाजू मांडली. त्यांच्या या पुढाकारामुळे पीडित रिक्षाचालकाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव शहरात गजानन माळी या रिक्षाचालकाला एका कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच संबंधित कारचालकाने बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोपही रिक्षाचालकाने केला आहे. संबंधित कारचालक मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी असल्याने तक्रार देऊनही पोलिसांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना पीडित रिक्षाचालकाने व्यक्त केली. त्यामुळे हताश झालेल्या रिक्षाचालकाने न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम यांच्याकडे मदतीची मागणी केली.

सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ॲड. निकम यांनी रिक्षाचालकाची व्यथा समजून घेत त्याला मदतीचा हात दिला. त्यानंतर त्यांनी पीडित रिक्षाचालकाला सोबत घेऊन थेट जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच रिक्षाचालकावर झालेल्या कथित अन्यायाची गांभीर्याने दखल घेऊन त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

ॲड. निकम यांनी मांडलेल्या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ॲड. अनिकेत निकम यांनी केवळ आश्वासन न देता स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पीडिताची बाजू मांडल्याने एका कष्टकरी रिक्षाचालकाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी दाखविलेली सामाजिक बांधीलकी सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ॲड. अनिकेत निकमअनिकेत उज्ज्वल निकमजळगाव न्यूजजळगाव शहर पोलीस ठाणेरिक्षाचालकाला न्यायरिक्षाचालकाला मारहाण
Previous Post

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif