• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती?

राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण; एकनाथराव खडसे यांची यांच्या भाजप प्रवेश चर्चेला पुन्हा सुरु.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 19, 2026
in जळगाव, राजकारण
एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  (योगेश सुने चीफ एडिटर) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. खडसे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष लागले आहे. 30रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सोहळ्याच्या पत्रिकेत मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची विशेष उपस्थिती नमूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पत्रिकेच्या पुढील पानावर राज्यातील विविध राजकीय पक्षांतील मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये महायुतीतील अनेक प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय राजकीय नेते एकत्र येणार का? याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या या भव्य निमंत्रण पत्रिकेत विविध राजकीय पक्षांतील नेत्यांना स्थान मिळाल्याचे दिसून येते.

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेल्या खडसेंच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि त्याचवेळी शरद पवार यांचीही उपस्थिती ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. खडसे यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने फडणवीस आणि पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याने या सोहळ्यातील राजकीय संदेश काय असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

पत्रिकेत राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांची नावे व छायाचित्रे असल्याने हा केवळ वाढदिवसाचा सोहळा न राहता राजकीय शक्तिप्रदर्शन आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठींचे व्यासपीठ ठरणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पत्रिकेतील नेत्यांची उपस्थिती ही निमंत्रणातील नोंद असून प्रत्यक्ष कार्यक्रमाला कोणकोणते नेते उपस्थित राहतात, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे. मात्र आता या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आ.एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेश याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ते या सोहळ्या दरम्यान प्रवेश करणार काय?  मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येतील काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता या अभिष्टचिंतन सोहळ्याला मिळतील काय याबाबत राजकीय क्षेत्रात सह त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: एकनाथ खडसेखडसे अभिष्टचिंतन सोहळाखडसे अमृत महोत्सवदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारशरद पवार
Previous Post

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे 

Next Post

युवतीं दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
युवतीं दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन

युवतीं दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif