• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नशामुक्तीची शपथ ग्रहण 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 18, 2026
in जळगाव, आरोग्य
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्याची परीस्थिती अत्यंत भयावह आहे. गतवर्षी पोलिसांनी ६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. यंदा ४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. १७ ते ३० या वयोगटातील तरूण व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. व्यसनांचे हे वळण सिन्थेटीक पध्दतीकडे वळाले असून पोलीस विभागाने संकल्प केलेल्या मिशन राइज एक्सचे यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा पोलीस दल आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन राइज एक्स या कार्यक्रमाचे सोमवारी (१६ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबले, प्रशिक्षणार्थी डिवायएसपी श्री. दरेकर, एलसीबीचे पोनि राहुल गायकवाड, पोनि राहुल वाघ, एपीआय योगिता नारखेडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, हृदयालयाचे विभाग प्रमुख डॉ. वैभव पाटील, युवाशक्तीचे अध्यक्ष विराज कावडीया, ज्यु. मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मिशन राइज या लोगोचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील उत्कर्ष भोसले, प्राची मुरळे, कौस्तुभ वडगावकर, ओम चौधरी, पायल यांची मिशन राइजसाठी निवड करण्यात आली.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. महाडीक यांचे सादरीकरण

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनांची विविध कारणे, त्यामुळे शरीरावर होणारे विपरीत परिणाम आणि उपाययोजना याविषयी चलचित्रफितीद्वारे सादरीकरण केले. यासोबतच व्यसनांना नकार देण्याची हिंमत ठेवा असे आवाहनही डॉ. हुमेद महाडिक यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांना कायद्याबाबतही मार्गदर्शन

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राहुल गायकवाड यांनी अंमली पदार्थ सेवन करणार्‍यांविरोधात कायद्यात नेमक्या कुठल्या प्रकारच्या शिक्षा आहेत याविषयी चलचित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह मान्यवरांना नशामुक्तीची शपथही दिली.

नाही म्हणणे हाच योग्य मार्ग – डॉ. सोळंके

व्यसनांना नाही म्हणणे हाच योग्य मार्ग असल्याचे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हे समाजासाठी रोल मॉडेल आहेत. त्यामुळे रोल मॉडेल असलेल्या विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या या अभियाना सक्रीय सहभागी व्हावे. गोदावरी हेल्थ सिटीचा परिसर हा नशामुक्त असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात ज्यु. मकरंद अनासपुरे यांनी विविध राजकारणी, अभिनेते यांच्या मिमीक्रीच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले. तर आभार डिवायएसपी केदार बारबले यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. हर्षल बोरोले, होमीओपॅथी महाविद्यालयाचे डॉ. विद्यानंद आठवले यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अंमली पदार्थजळगाव पोलीसनशामुक्ती अभियाननशामुक्तीची शपथमिशन राइज एक्सश्रीकांत धिवरे
Previous Post

मंत्री गिरीश महाजनांना विठ्ठल पावला… विठ्ठल चरणी माथा ठेवीता, मिळाली पालकमंत्रिपदाची जबाबदारी!

Next Post

एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती?

एकनाथराव खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीसांसह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif