• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेस जैन हिल्सला प्रारंभ;सत्य, अहिंसा, समता आणि सामाजिक न्यायाचा जागर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 8, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : सत्य, अहिंसा, समता, सेवा आणि स्वावलंबन या गांधीवादी मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान व उद्योजकतेची जोड देऊन समाजातील वंचित घटकांना सन्मानासोबत आर्थिक समृद्धी मिळवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेस जैन हिल्सला प्रारंभ झाला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकरकुमार सन्याल तर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन उद्घाटक होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी खासदार नरेशकुमार यादव, डॉ. सुदर्शन अय्यंगार, माजी राज्य मंत्री संजय पासवान, महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष मोहन जोशी, जळगाव हरिजन सेवक संघाचे सचिव शंभु पाटील, सुधेंद्र कुळकर्णी, कुंवर शेखर, पवनार आश्रमाच्या ज्योती दिदी या मान्यवरांची उपस्थिती होती. या परिषदेस देशभरातील गांधीवादी विचारवंत, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी सर्वधर्म प्रार्थना झाली. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांचे ‘हर देश में तू, हर वेश में तू’ हे गीत प्रशांत सूर्यवंशी यांनी सादर केले. जळगाव हरिजन सेवक संघाचे सचिव शंभू पाटील यांनी प्रास्तविक केले तर महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही परिषद होत असल्याचे सांगत, परिषदेतून गांधीजींचा सत्य, अहिंसा, समता, स्वच्छता आणि सर्वसमावेशकतेचा विचार आत्मसात करून समाजासाठी नवा विचार, नवा मार्ग आणि नवा कार्यक्रम घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. अशोक जैन व अनिल जैन यांनी श्रद्धेय. भवरलालजी जैन यांच्या गांधीवादी विचारांना पुढे नेत समाजसेवेचे कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘वेस्ट टू वेल्थ’मधून नव्या संधी- अनिल जैन

शेती आणि उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर अर्थात ‘वेस्ट टू वेल्थ’ ही नव्या युगातील मोठी संधी आहे. कचऱ्यातून ऊर्जा, रोजगार आणि संपत्ती निर्माण करून वंचित घटकांना उद्योजक बनविता येऊ शकते. गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची शक्ती यांची सांगड घालून सन्मान आणि समृद्धीचा नवा भारत घडविता येईल, असा विश्वास या कार्यक्रमाचे उद्घाटक जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी व्यक्त केला. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून आजच्या भारताला आणि विशेषतः देशाचे भविष्य घडविणाऱ्या तरुण पिढीला गांधीजींचे विचार व मूल्ये पोहोचविण्यासाठी गांधीतीर्थची निर्मिती श्रद्धेय मोठ्याभाऊंनी केली आहे, असे ही नमूद केले. तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात सत्य, अहिंसा, समता, स्वावलंबन आणि मानवतेची मूल्ये तरुणांच्या मनापर्यंत पोहोचत आहे असे ही ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शंकरकुमार सन्याल यांनी सांगितले की, ‘सत्य, सेवा आणि समतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हाच गांधी विचारांचा खरा वारसा असल्याचे सांगितले. संघर्षमय आणि अस्थिर होत चाललेल्या जगात गांधी विचार अधिक प्रासंगिक ठरत असून शांतता, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास आणि मानवकल्याणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले. हरिजन सेवक संघाने शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून गांधींचे कार्य पुढे नेत असल्याचे सांगितले. तरुण पिढीने गांधी विचारांची सांगड आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारीशी घालावी, असेही ते म्हणाले.

डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी गांधी विचारांच्या सखोल अभ्यासासोबतच रचनात्मक कार्य आणि ग्रामस्वराज्य बळकट करण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना त्यामागील ‘तत्त्व’ जपले पाहिजे. सेवाभावात अहंकार न आणता समाजाच्या विकासात सहभागी होण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. गांधींच्या प्रेमभावनेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाच्या संघर्षशील विचारांना एकत्र आणण्याची गरज असल्याचेही डॉ. अय्यंगार यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला यांनी केले. परिषदेत सहभागी या सर्व मान्यवरांनी गांधी तीर्थ येथे भेट दिली. सायंकाळी जैन हिल्स येथे महात्मा गांधी यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित ‘बंदे में है दम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या परिषदेत सहभागी सर्वजण धुळे येथील कारागृहास भेट देणार आहेत जिथे विनोबा भावे व साने गुरुजींनी कारावास भोगला त्या भूमिला नमन करून दुपारी या परिषदेत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात विचार विनिमय होणार आहे.

फोटो कॅप्शन – हरिजन सेवक संघाच्या परिषदेचे औपचारीक उद्घाटन करताना अनिल जैन, डॉ. शंकर सन्याल, नरेश यादव, मोहन जोशी, शंभू पाटील आदी मान्यवर

बातमी शेअर करा !
Tags: गांधी रिसर्च फाउंडेशनगांधी विचारजळगावजैन हिल्समहात्मा गांधीहरिजन सेवक संघ
Previous Post

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Next Post

डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif