• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

हिरोशिमा दिनानिमित्त सर्वधर्म प्रार्थनेतून विश्वशांतीचा संदेश; देशभरातील व परदेशातील सुमारे १०० प्रतिनिधींची उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 7, 2026
in जळगाव, Uncategorized
गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !
नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: हिरोशिमा दिनानिमित्त जळगाव येथील गांधी उद्यान येथे गुरुवारी ६ रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन व हरिजन सेवक संघाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा व नागासाकीवर झालेल्या अणुबाँब हल्ल्याच्या स्मृतींना अभिवादन करत जगात शांतता, बंधुता आणि अहिंसेचा संदेश दृढ व्हावा, तसेच अशा विनाशकारी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, रामकुमार मंडल, निशा त्यागी यांच्यासह गांधी तीर्थचे उदय महाजन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्य आणि विश्वशांतीच्या विचारांचे स्मरण करून समाजात सलोखा व सद्भावना वाढविण्याचे आवाहन केले.

दरम्यान, गांधी तीर्थ येथे हरिजन सेवक संघाचे ७ ऑगस्ट पासून तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत असून, देशाच्या विविध राज्यांतील तसेच परदेशातून आलेले सुमारे शंभर प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. विविध गांधीवादी, समाजसेवक, विचारवंत आणि कार्यकर्ते यावेळी गांधी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर चर्चा करून आगामी काळातील कार्याची दिशा निश्चित करणार आहेत.

या अधिवेशनाला संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरकुमार सन्याल, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेश यादव, राष्ट्रीय सचिव संजय राय, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सचिव मधुकर शिरसाठ, राजीव देशपांडे, जळगाव जिल्हा हरिजन सेवक संघाचे शंभू पाटील तसेच संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रे, संवाद आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गांधी तीर्थगांधी रिसर्च फाऊंडेशनजळगावमहात्मा गांधीहरिजन सेवक संघहिरोशिमा दिन
Previous Post

जळगाव शहरात १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण महोत्सवाचे आयोजन

Next Post

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif