• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौरांसह नगरसेवक उतरले जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी धाडस!

पावसाळापूर्व स्वच्छता अभियान, शुद्ध पाणी मिळण्यासाठी कृतीशील पाऊल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 20, 2026
in जळगाव, महापालिका
महापौरांसह नगरसेवक उतरले जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी धाडस!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : “शहराला शुद्ध पाणी मिळणे हा जळगावकरांचा हक्क आहे,” हे केवळ बोलून न दाखवता जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. सोमवारी दुपारी भाऊंच्या उद्यानातील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीची (जलकुंभ) पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौरांनी चक्क टाकीत उतरून साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला.

ठळक वैशिष्ट्ये

कर्तव्यदक्षता: पावसाळ्यापूर्वी जलकुंभांची स्वच्छता व्हावी यासाठी महापौरांचा पुढाकार.

संवेदनशीलता : पाण्याच्या टाकीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तातडीने चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

नियोजन: डिसेंबर महिन्यात पुन्हा स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची दिली माहिती.

सोमवारी २० एप्रिल दुपारी ४ वाजेच्या सुमारास महापौर दीपमाला काळे या भाऊंचे उद्यान परिसरातील सुमारे १०० फूट उंच जलकुंभावर पोहोचल्या. २८ लाख लिटर पाण्याची क्षमता आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, या उद्देशाने जलकुंभांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यावेळी कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी महापौर स्वत: निसरड्या झालेल्या लोखंडी शिडीवरून पाण्याच्या टाकीत उतरल्या. त्यांच्यासोबत प्रभागाचे नगरसेवक नितीन बरडे, नगरसेवक रितिक ढेकळे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता घृष्णेश्वर साळुंखे यांनीही टाकीत उतरून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

कर्मचाऱ्यांसाठी दाटली ‘माणुसकी’

टाकीच्या आत प्रचंड दम कोंडणाऱ्या वातावरणात ७ कर्मचारी जीव ओतून साफसफाईचे काम करत होते. त्यांची ही मेहनत पाहून महापौरांचे मन हेलावले. त्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि चहा मागवण्याचे आदेश दिले. “तुम्ही खूप मनापासून आणि चांगले काम करत आहात,” अशा शब्दांत महापौरांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

स्वच्छतेचा ‘डिसेंबर’ प्लॅन

या मोहिमेअंतर्गत शहरातील तीन जलकुंभ गाळ काढून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले आहेत. केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित न राहता, “डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारे सर्व टाक्यांची साफसफाई केली जाईल,” असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

या मोहिमेच्या वेळी प्रभाग क्रमांक १२ येथील नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, नितीन बरडे, प्रभाग क्रमांक १३ चे नितीन सपके, प्रफुल्ल देवकर, प्रभाग १४ चे रबियाबी अमजद खान, रितिक ढेकळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांच्या या तत्परतेमुळे आणि कामातील पारदर्शकतेमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या कर्तव्यदक्षतेची आणि संवेदनशीलतेची सध्या शहरात मोठी चर्चा होत आहे. केवळ आदेश न सोडता स्वतः पाण्याच्या टाकीत उतरून कामाचा आढावा घेणाऱ्या महापौरांच्या या ‘अ‍ॅक्शन मोड’मुळे जळगावकरांना शुद्ध पाणी मिळण्याची खात्री मिळाली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जलकुंभजळगावदीपमालाकाळेपाणीपुरवठामहापौरस्वच्छतामोहीम
Previous Post

त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत रोजगार मेळावा; २० विद्यार्थ्यांची निवड

Next Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif