• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

जळगाव क्रिकेट लिगमध्ये षटकार, चौकारांची आतीषबाजी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 19, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज

जळगाव दि. १९ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची आतीषबाजी बघायला मिळत आहे. दुसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंगचा ओम भोसले याने धुवांधार शतक ठोकले. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजच्या गोलंदाजींचा समाचार घेत त्याने ५८ चेंडूमध्ये ९ चौकार व ६ षटकार लगावत १०८ धावा करुन एकतर्फी सामना फिरवला.

शनिवारी झालेल्या उद्घाटन सामन्यात उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, अशोक जैन यांच्या उपस्थितीत नाणफेक झाली. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेर्न्सजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जळगाव क्रिकेट लीगमधील सर्वाधिक महाग ठरलेल्या कर्णधार ओम मुंडे याने ४८ चेंडूत ८१ धावा केल्यात. त्यात त्याने ५ चौकार व ४ षटकार लगावले. त्याला ११ चौकार व १ षटकारच्या मदतीने ८१ धावा ५८ चेंडूत करत साहिल गायकर याने उत्तम साथ दिली. दोघांच्या जोरदार खेळीमुळे निर्धारित २० षटकात ६ गडींच्या मोबदल्यात १७६ धावा केल्यात.

जळगाव कोगटा किंग संघाने १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी संयम व आक्रमता दाखवित गोलदाजांवर जोरदार प्रहार केला. शतकवीर ओम भोसले याला जितेंद्र नाईक याने ३३ चेंडूत ४१ धावा त्यात (५ चौकार व १ षटकार) करत चांगली साथ दिली. धावगतीवर कुठलाही परिणाम न होऊ देता दोघांनी एकतर्फी सामना खेचून आणला. १६.४ षटकांत १७७ धावांचे लक्ष्य दोन गड्यांच्या मोबल्यात सहज पूर्ण केले. मनिष चव्हाण याने तीन चौकारच्या मदतीने ९ चेंडूंमध्ये १६ धावा करत विजयाची औपचारिकता पुर्ण केली. चाळीसगाव चॅलेर्न्सजच्या ओम मुंडे, अमेय कोळी यांना प्रत्येकी १ गडी बाद करता आले.

दरम्यान सामनावीर म्हणून ओम भोसले यांना गौरविण्यात आले. तर जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या संकल्पनेतून मोस्ट डॉट बॉल म्हणून मेहुल इंगळे याने ४ ओव्हर मध्ये २८ धावा देत २ विकेट घेतल्याने त्याला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नवरंग चहाचे अमर कुकरेजा, अलरिक इलेक्टि्कलचे सीईओ दीपक चौधरी, वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रविण कुंजवाला, दाल परिवाराचे अतुल कोगटा, सागर क्रिकेट क्लबचे विजय मराठे यांची उपस्थिती होती. पंच म्हणून संदीप गांगुर्डे, संदीप चव्हाण यांनी काम पाहिले तर थर्ट अम्पायर मंगेश नार्वेकर, मॅच रेफरी म्हणून विनित कुलकर्णी यांनी काम पाहिले.

*जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर सोमवारी तीन सामने*

दि. २० एप्रिल सकाळी ८.३० वाजेला चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज.

 

दि. २० एप्रिल दुपारी ३ वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.

 

दि. २० एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.

 

(OM BOSALE) – जळगाव कोगटा किंगचा शतकवीर ओम मुंढ

(Untitled design (1)) – विजयी टिम चे पारितोषीक स्वीकारताना जळगाव कोगटा किंगचा कर्णधार जगदीश झोपे.

(DSC5971(1)(1)) पन्नास धावा पूर्ण केल्यानंतर आनंद साजरा करताना ओम मुंढे

बातमी शेअर करा !
Tags: JCL2026T20क्रिकेटओमभोसलेकोगटाकिंगजळगावक्रिकेटलिगशतक
Previous Post

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

Next Post

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif