• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home घटना

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गोशाळेसमोरील येथील घटना; वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची रहिवाशांची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 20, 2026
in घटना, जळगाव ग्रामीण
कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – तालुक्यातील कुसुंब्यात वन्यप्राण्यांनी एका फार्महाऊसमधील चार वासरांचा दोन रात्रीत हल्ला करून फडशा पाडला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामे केले आहे. या फार्महाऊसवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अहिंसा तीर्थ गोशाळेसमोर अनंत पाटील यांचे फार्महाऊस आहे. यात गेल्या २०-२२ वर्षांपासून गायी आणि वासरे बांधलेली असतात. शनिवारी सकाळी साडेसातला अनंत पाटील गायीचे दूध घेण्यासाठी फार्महाऊसमध्ये गेले असता तीन वासरे मृत आढळली. यात २ वर्षाचा एक, १८ महिन्याचा एक व तिसरा १२ महिन्याच्या वासराचा समावेश आहे. ही माहिती त्यांनी पोलिस पाटील

हल्लेखोर  प्राणी नेमका कोणता?

हल्ल्यानंतर आता अनंत पाटील यांनी फार्महाऊसमधील ६ गायी व १ वासरू गावात नेऊन बांधले आहे. तसेच फार्महाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. दरम्यान, रात्रीच्या सुमाराला वासरांवर हल्ला करणारा वन्य प्राणी तडस किंवा कोल्हा असण्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.

परिसरात भीती, वनविभागासह पशुवैद्यकीयचा पंचनामा

राधेश्याम चौधरी, पशुसंवर्धन एमआयडीसी अधिकारी, पोलिस व वन विभागाला कळवली. सुरुवातीला सर्वांनी कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवली. मात्र, हा वन्य प्राण्यांचा हल्ला असल्याची खात्री असल्याने अनंत पाटील यांनी शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानंतर जळगावहून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले

रविवारीही  घटनेची पुनरावृत्ती 

रविवारी सकाळी अनंत पाटील हे फार्महाऊसवर गेल्यावर त्यांना पुन्हा २ वर्षाच्या वासराचे पोट फाडून अर्धवट खाल्लेले आढळले. वन विभागाला पुन्हा कळवल्यावर त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी वनपाल उमाकांत कोळी, मेहरूणचे वनरक्षक अजय रायसिंगे, उमाळ्याचे वनरक्षक हरीश थोरात, पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा !
Tags: कुसुंबाजळगावतडसफार्महाऊस घटनावन्यप्राणी हल्लावासरांचा मृत्यू
Previous Post

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

Next Post

जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif