• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक… जळगाव क्रिकेट लिग बघण्यासाठी जैन ड्रीम स्पेसेस वर तुफान गर्दी..

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 19, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज

जळगाव दि.१९ प्रतिनिधी – मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर सुरु असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 स्पर्धेत रोमांच वाढत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग चा तिसऱ्या सामना अमळनेर सुहांस जायंटस विरूद्ध जळगाव कोगटा किंग यांच्यात खेळविण्यात आला.

नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटस ने जिंकून कर्णधार शुभम शर्मा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकप्रसंगी बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. जळगाव कोगटा किंगच्या मजबुत फलंदाजीचे दर्शन आज पुन्हा घडले. पहिल्या चार ओव्हर मध्ये ४४ धावा ओम भोसले व जितेंद्र नाईक यांनी जोडल्यात. धोकादायक ठरत असलेल्या भागीदारीला गौरव ठाकूर ने जितेंद्र नाईकची विकेट घेत तोडली. यानंतर सामन्याचे सर्व सुत्रे आपल्या हाती घेत १० उत्तूंग षटकार खेचत ८ चौकारांसह वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसले याने शतक ठोकले. अवघ्या ६५ चेंडूत १३० धावा करुन त्याने विक्रम रचला. त्याला अक्षय मेघानी २७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३३ धावा करत चांगली साथ दिली. निर्धारीत २० षटकांमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात जळगाव कोगटा किंगने २२० धावांचे विशाल लक्ष्य रचले.

पलटवार करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरवात अडखळत झाली. कर्णधार शुभम शर्मा ने एकतर्फी किल्ला लढवत ३९ चेंडूत ६८ धावा केल्यात त्या पाच चौकार व ४ षटकार लगावले. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा केला त्यासाठी त्याने तब्बल चार षटकार खेचले व एक चौकार लगावला. रणजीत निकम याने १५ चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीन २५ धावा करून सामनात रंगत आणली. शेवटी ६ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंतच अमळनेर सुहांस जायंटसला मजल मारता आली. जळगाव कोगटा किंग संघाकडून मनिष चौहान ने ४ ओव्हरमध्ये ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट पटकाविला. कर्णधार जगदीश झोपे, बिपीन चांगरे प्रत्येकी एक गडी बाद केला. जळगाव कोगटा किंग ३१ धावांनी विजयी झालेत. सलग दोन विजयांसह ४ गुण घेऊन जळगाव कोगटा किंग अव्वल स्थानावर पोहोचला. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ओम भोसले याला मिळाला. तर डॉट बॉल साठी राज बेलदार या खेळाडूला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी दाल परिवारचे प्रेम कोगटा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल, नितीन पाटील यांची उपस्थीती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर, संदीप गांर्गुेडे यांनी काम पाहिले. तर गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

 

बातमी शेअर करा !
Tags: T20स्पर्धाअमळनेरसुहांसजायंटसक्रिकेटन्यूजजळगावकोगटाकिंगजळगावक्रिकेटलिगशतक
Previous Post

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

Next Post

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; दोन रात्रींत चार वासरांचा फडशा

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

ब्रह्मश्री संस्थेच्या श्री भगवान परशुराम पालखीचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत..

April 19, 2026
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पेक्षाही जेसीएलचे ग्राउंड चांगल्या दर्जाचे – मंत्री गिरीश महाजन

April 19, 2026
चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

चाळीसगाव होणार स्वतंत्र जिल्हा?

April 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif