• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पाच हजारांत ‘झोपडी प्लॉट’ विक्रीचा प्रकार; मनपाच्या जागेवर अतिक्रमणांचा स्फोट

महापौर दीपमाला काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती; 2022 नंतर झोपड्या वाढल्या, 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 8, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, महापालिका
पाच हजारांत ‘झोपडी प्लॉट’ विक्रीचा प्रकार; मनपाच्या जागेवर अतिक्रमणांचा स्फोट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – ( योगेश सुने चीप एडिटर ) नवराज्य Live न्यूज

महानगरपालिकेच्या मालकीच्या मोहाडी गट क्रमांक 60 येथील सुमारे 13 एकर जागेवर अतिक्रमणाचा गंभीर प्रकार समोर आला असून, अज्ञात व्यक्तींनी तांबापुरा भागातील रहिवाशांना प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये घेऊन झोपडीसाठी जागा विकल्याची धक्कादायक माहिती महापौर दीपमाला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतील महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोना काळानंतर ऑक्टोबर 2022 पासून या परिसरात काही तुरळक झोपड्या दिसू लागल्या. मात्र, 2024 नंतर अचानकपणे मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे अतिक्रमण उभे राहिले आहे. तांबापुरा परिसरातील काही नागरिकांनी आपली घरे विकल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांना ही मनपाची जागा परस्पर विकल्याचे समोर आले आहे.

सदर जागा माजी नगराध्यक्ष तुकाराम श्रीपत चौधरी यांनी महानगरपालिकेसाठी विकत घेतली होती. 1997 ते 2011 या कालावधीत येथे अटलांटा कंपनीचा क्रशर होता. त्यानंतर जागा रिकामी पडून होती आणि 2017-18 मध्ये स्लॉटर हाऊसही बंद करण्यात आले.

 

महापौर काळे यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार 2011 पूर्वीच्या शासकीय जागांवरील अतिक्रमण नियमित करण्याची तरतूद आहे; मात्र महानगरपालिका मालकीच्या जागांवर हा नियम लागू होत नाही. तसेच 2022 नंतर झालेल्या अतिक्रमणांनाही कोणतीही कायदेशीर मान्यता मिळणार नाही.

महानगरपालिकेच्या जागा आधीच मर्यादित असल्याने त्या जतन करणे आवश्यक असून, संबंधित जागेभोवती कंपाउंड वॉल उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. लवकरच ही जागा संरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

नागरिकांनी या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण करू नये, अन्यथा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला.

या पत्रकार परिषदेस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थायी समिती सदस्य ॲड. सुचिता हाडा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणजळगाव न्यूजपाच हजारमनपा जमीनमहापालिकामहापौर
Previous Post

भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ : जळगावात भव्य आयोजनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

Next Post

धीरज सोनी यांना पत्नी शोक!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
धीरज सोनी यांना पत्नी शोक!

धीरज सोनी यांना पत्नी शोक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif