बोधगया,महाविहार, दीक्षाभूमी विकास, जातीनिहाय जनगणना, जुनी पेन्शन योजना यांसह विविध मागण्यांवर आंदोलन
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव : बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनांच्या वतीने चरणबद्ध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. याआधी १० सप्टेंबर रोजी या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे पुज्य भंते धम्मदीप यांच्या नेतृत्वाखाली व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांच्या पुढाकाराने हे आंदोलन पार पडले. जिल्हाधिकाऱ्यांना भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन देवानंद निकम व महिला कार्यकर्त्यांनी दिले, तर निवासी उपजिल्हाधिकारी माळी यांना बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कमार्फत भंते धम्मदीप, भंते संघसेवक, भंते अमरज्योती, भंते संघरक्षित यांनी निवेदन सादर केले.
बौद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या मागण्या :
बोधगया महाबोधी विहारावरील ब्राह्मणांचा अनधिकृत कब्जा हटवून विहार बौद्धांना सुपूर्द करावा.
नागपूर येथील दीक्षाभूमी येथे धम्मशिक्षण केंद्राची निर्मिती करावी.
दीक्षाभूमीजवळील कृषी महाविद्यालय स्थलांतरित करून १००० भंते सामावतील असे प्रशिक्षण व निवास केंद्र उभारावे.
१००० लोकांचे विशाल ग्रंथालय, वाचनालय व प्रबोधन केंद्राची उभारणी करावी.
देश-विदेशातील बौद्धांसाठी विश्रामगृह उभारणी.
दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करावे.
भारत मुक्ती मोर्चाच्या मागण्या :
निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात.
ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करावी.
आदिवासी नागरिकांवरील अत्याचार थांबवावेत.
मुस्लिमांची मॉबलिंचिंग रोखावी.
धर्मांतरित आदिवासी व ख्रिश्चन यांच्यावर होणारा भेदभाव थांबवावा.
एससी, एसटी व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे.जळगाव शहर व जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
जळगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करावे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी.या आंदोलनात भंते संघरत्नजी थेरो, भंते संघसेवकजी, भंते अमरज्योतीजी, भंते संघरक्षितजी, सुमित्रा अहिरे, विनोद अडकमोल, सुनिल देहडे, अ. करीम सालार, मुकुंद सपकाळे, आर.बी. परदेशी, डॉ. शाकीर शेख, सतीश गायकवाड, विजय सुरवाडे, खुशाल सोनवणे, योगेश सोनवणे, शेषराव पाटील, चंद्रशेखर अहिरराव, अकील पिंजारी, पी.डी. सोनवणे, गनी शाह, दिलीप सपकाळे, प्रा. मीनाक्षी वाघमारे, संगीता देहडे, राजश्री अहिरे, उज्ज्वला इंगळे, माया खंडारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.







