• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनोबलचे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे विचार जागतिक स्तरावर घेऊन जातील – आ.अतुल भातखळकर 

विश्वबंधुत्व दिना’निमित्त स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 12, 2025
in जळगाव, सामाजिक
मनोबलचे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे विचार जागतिक स्तरावर घेऊन जातील – आ.अतुल भातखळकर 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मनोबलचे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे विचार जागतिक स्तरावर घेऊन जातील – आ.अतुल भातखळकर

 

विश्वबंधुत्व दिना निमित्त स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

 

जळगाव,- विश्वबंधुत्व दिनानिमित्त दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पात स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहात पार पडले. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे जीवनविचार, त्यांची शिकवण आणि त्यांच्या संदेशांचे आजच्या युगातील महत्त्व अधोरेखित झाले.

 

समारंभाची सुरुवात मंगलप्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रेरणादायी ‘विवेकानंद गीताने’ उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यास आमदार श्री. अतुल भातखळकर, सौ. रश्मी भातखळकर, जळगाव शहराचे आमदार श्री. राजुमामा भोळे, प्रा. जी. आर. महाजन आणि प्रख्यात हृदय भुलतज्ञ डॉ. अलका मांडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

प्रा. जी. आर. महाजन यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध तीन मुद्रांचा सखोल अर्थ उलगडून सांगितला.तसेच 11 सप्टेंबर विश्वबंधुत्व दिनाची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला.

 

आ. अतुल भातखळकर आमदार अतुल भातखळकर म्हणाले की,”स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे प्रत्यक्ष रूप दीपस्तंभ मनोबल या अद्वितीय प्रकल्पामध्ये बघायला मिळाले.

सर्वांना सामावून घेणारा हिंदू धर्म हा विश्वबंधुत्वाची शिकवण देतो सर्व धर्मांमधल्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतो. जगाला सर्वप्रथम भारतीय तत्त्वज्ञानाची धर्माची आणि भारतीय लोकांच्या क्षमतांची ओळख स्वामी विवेकानंदांनी करुन करून दिली.

तसेच स्वामीजींनी आपल्या धर्मातील चुकीच्या परंपरांवर सुद्धा कठोर टीका करून परिवर्तनाची बीजे रोवली”.

 

दीपस्तंभ ‘मनोबल’चे संस्थापक श्री. यजूरवेंद्र महाजन यांनी सांगितले की, “स्वामी विवेकानंदांचे विचार हेच ‘दीपस्तंभ मनोबल’चे प्रेरणास्थान आहे. समता, करुणा , सेवा आणि धैर्य या मूल्यांचा आविष्कार प्रत्येक उपक्रमातून व्हावा, हाच आमचा प्रयत्न असतो.

बातमी शेअर करा !
Previous Post

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सर्वसाधारण गटासाठी राखीव

Next Post

जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

जिल्हा परिषदेत ८६ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif