मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार
जळगाव – खान्देश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे,जळगाव,नंदुरबार तर्फे आयोजित भव्य विशेष गुणगौरव समारंभ प्रसंगी मुकुंद गोसावी यांचा सपत्नीक समाजातर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
देवपूर परिसर धुळे येथील गोसावी समाज सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुकुंद गोसावी यांचा आरोग्य व रक्तदान सेवेत योगदान मोठे असल्याने त्यांचा वेळोवेळी विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना गौरविण्यात आले आहे.
यावेळी राज्यभरातील समाज प्रतिनिधी विविध स्तरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी समाजातील प्रथितयश व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी हे सामाजिक बांधिलकी जोपासत सदैव निरपेक्ष सेवाकार्य करून प्रत्यकाला मदत करीत असतात.मोठे शारीरिक व्यंग असूनही आपल्या जवळ जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून इतरांची मदत करण्यात मुकुंद गोसावी यांचा समाजात पुढाकार असतो.
आरोग्य व रक्तदान सेवेत त्यांचे योगदान मोठे असल्याने त्यांचा विशेष स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला असल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.







