• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक–आ. सुरेश भोळे

भाजप जळगाव महानगरतर्फे जयंतीनिमित्त अभिवादन : खासदार स्मिता वाघ यांची विशेष उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 16, 2026
in जळगाव, Uncategorized
बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक–आ. सुरेश भोळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि देशभक्ती आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श पुढील पिढ्यांना सदैव मार्गदर्शन करणारा ठरेल, असे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले.

जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते तथा उपाध्यक्ष उदय भालेराव आणि अनिल सपकाळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा, सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.

 

भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान आणि एकतेची भावना जागृत केली. त्यांचे धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा ही आजच्या तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली पाटील, भाजप जळगाव महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, पितांबर भावसार, ललित बडगुजर, सागर पाटील, सचिन बाविस्कर, प्रकाश पंडित, मयूर भदाणे, एसटी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक कोळी, महेश चौधरी, संतोष इंगळे, किरण भोई, तुषार सूर्यवंशी, रवींद्र फालक, दिलीप लाडवंजारी, दिलीप नाझारकर, राजेंद्र मराठे, संजय बाविस्कर, अनिल कोळी, जया सोनवणे, स्नेहा कोळी, शोभा कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परदेशी यांनी केले. जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांनी त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून विनम्र अभिवादन केले.

बातमी शेअर करा !
Tags: आदिवासी समाजआमदार सुरेश भोळेखासदार स्मिता वाघजळगाव बातम्याबिरसा मुंडा जयंतीभाजप जळगाव महानगर
Previous Post

जळगावात बारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक–आ. सुरेश भोळे

बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक–आ. सुरेश भोळे

November 16, 2026

जळगावात बारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न!

November 15, 2026
रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif