नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव :बारी समाजातील विवाहयोग्य वधू-वरांना एकमेकांची ओळख व्हावी, तसेच विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, या उद्देशाने नागवेल प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने आयोजित बारी समाज वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप परिसरातील दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बारी समाजातील विवाहयोग्य वधू-वर, त्यांचे पालक तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.
समाजातील विवाहयोग्य मुला-मुलींना आपल्या जीवनसाथीची निवड करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच समाजातील कुटुंबांमध्ये परस्पर संवाद, परिचय आणि सलोखा वाढावा, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, नगरसेवक विशाल भोळे , नगरसेविका माधुरी बारी, माजी नगरसेविका शोभाताई बारी, यावलचे नगरसेवक सुनील शिनकर, यावल नगरसेविका वैशाली बारी, नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद वराडे, उपाध्यक्ष योगेश येऊन, सचिव प्रकाश रोकडे यांच्यासह अतुल गुजर, शैलेश बारी, देविदास येऊल, वर्धा अध्यक्ष मयूर सायरे, उद्योजक यशवंत बारी, लतिष बारी, भूषण बारी, गिरीश वराडे, पुंडलिक बारी, संतोष बारी, अतुल बारी, अरुण बारी, योगेश बारी, विजय बारी, बंटी लावणे, नितीन बारी, बकमुकुंद बारी, महेंद्र बारी, राहुल पाटील, राजू बारी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देणारा आणि विवाहयोग्य वधू-वरांसाठी उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक बारी आणि संगीता बारी यांनी केले.





