• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा; जळगावसाठी १० कोटी मंजूर!

आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याला यश; शहरातील १९ प्रभागांतील विकासकामांसह प्रमुख प्रवेशमार्गांवर होणार प्रकाशव्यवस्था

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 6, 2026
in जळगाव, राजकारण
शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा; जळगावसाठी १० कोटी मंजूर!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

 

जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक वातावरण उपलब्ध होईल.

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्याचा विषय असून, शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठीही भविष्यात शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठीही संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

यावेळी जळगांव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार, मंत्री  गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

 

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा !
Tags: १० कोटी निधीआमदार सुरेश भोळेजळगावजळगाव महानगरपालिकाजळगाव विकासकामेजळगाव शहर
Previous Post

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

Next Post

आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेंतर्गत शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेंतर्गत शेकडो  रुग्णांवर यशस्वी उपचार!

आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेंतर्गत शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif