• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार’ चित्रपटाचा दीपस्तंभ मनोबलच्या २६८ विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव!

अंध व कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था; चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसमावेशकतेचा प्रेरणादायी अनुभव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 28, 2026
in जळगाव, Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबलच्या वतीने दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ सरकारी वकील मा.ॲड.उज्ज्वल निकम यांच्या जीवनकार्यावर आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘प्रहार’ हा चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. या उपक्रमात मनोबलचे २६८ विद्यार्थी आणि ३१ कर्मचारी सहभागी झाले.

चित्रपटातून विद्यार्थ्यांना २६/११ च्या हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीरांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा अनुभवता आली. तसेच या खटल्यातील कायदेशीर प्रक्रिया, पुराव्यांचे महत्त्व, संविधानाची ताकद आणि न्यायव्यवस्थेची भूमिका यांविषयी त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी केलेली विशेष व्यवस्था. अंध विद्यार्थ्यांना प्रसंग समजावेत, म्हणून त्यांच्यासोबत विद्यार्थी मित्र-मैत्रिणींची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दृश्ये, प्रसंग आणि घटनाक्रम समजावून सांगत अंध विद्यार्थ्यांना चित्रपटाचा आनंद घेण्यास मदत केली. कर्णबधिर विद्यार्थ्यांना संवाद आणि आशय समजावा, यासाठी सांकेतिक भाषेच्या दुभाषाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे चित्रपटाचा अनुभव घेता आला आणि सर्वसमावेशक समाजाचे सुंदर दर्शन घडले.

चित्रपट पाहिल्यानंतर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस आणि इतर शूरवीर यांच्याविषयीची कृतज्ञता व आदराची भावना विद्यार्थ्यांच्या मनात अधिक दृढ झाली. न्याय मिळवून देण्यासाठी पुरावे, साक्षीदार, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि संविधानिक मूल्ये किती महत्त्वाची असतात, याचीही जाणीव त्यांना झाली.

विद्यार्थी अक्षय हाडके याने व्यक्त केली चित्रपटातून मिळालेली शिकवण

प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्षय हाडके म्हणाला, “या चित्रपटातून न्याय हा भावनांवर नव्हे, तर पुराव्यांवर आणि संविधानाच्या चौकटीत चालतो, हे शिकायला मिळाले. भारतीय न्यायव्यवस्थेची ताकद आणि विशेष सरकारी वकिलांची जबाबदारी यांची जाणीव अधिक खोलवर झाली. हा चित्रपट केवळ माहिती देणारा नसून देशप्रेम, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा आदर करायला शिकवणारा अनुभव आहे. आदरणीय. ॲड.उज्ज्वल निकम साहेबांकडून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळाली.”

हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये, कायद्याविषयी आदर आणि सर्वसमावेशकतेची भावना रुजवणारा ठरला. दिव्यांग विद्यार्थ्यांना समान संधी देत, प्रत्येकाला शिक्षण, माहिती आणि सांस्कृतिक अनुभवांचा समान आनंद घेता यावा, या दृष्टिकोनातून हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.

बातमी शेअर करा !
Tags: २६/११ मुंबई हल्लाॲड. उज्ज्वल निकमदिव्यांग विद्यार्थीदीपस्तंभ फाऊंडेशनप्रहार चित्रपटमनोबल
Previous Post

इकरा शाहीन ज्युनिअर कॉलेजमध्ये ६० रोपांचे विद्यार्थ्यांकडून दान

Next Post

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचा सापळा! आयशरच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचा सापळा! आयशरच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif