नवराज्य Live न्यूज नेटवर्क
इकरा शाहीन ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझे झाड, माझी जबाबदारी’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून ६० रोपे दान करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि वनस्पतींच्या उपयुक्ततेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य रियाज अहमद जाफर शहा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुपरवायझर शेख जाकीर बशीर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली.
यावेळी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख खान सादिया जहांगीर खान यांनी विद्यार्थ्यांना विविध रोपांची सविस्तर माहिती दिली. वनस्पतींचे औषधी गुणधर्म, त्यांचे वनस्पतिशास्त्रीय महत्त्व आणि मानवी जीवनातील उपयुक्तता याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रियाज अहमद जाफर शहा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे पर्यावरणातील स्थान आणि मानवी जीवनातील त्यांची भूमिका याविषयी माहिती दिली. वृक्षांचे संगोपन व संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख खान सादिया जहांगीर खान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान मुस्तकी रफीक यांनी केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, जनरल सेक्रेटरी एजाज मलिक तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी रोपदानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभाग नोंदविला. ‘माझे झाड, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून वृक्षांचे केवळ रोपणच नव्हे, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.





