• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कारवाई

जळगावातील डॉक्टर PC-PNDT च्या रडारवर!

PC-PNDT विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून काही डॉक्टरांना ताकीद; आर्या हॉस्पिटलची सोनोग्राफी मशीन सील केल्यानंतर शहरातील काही डॉक्टर व केंद्रे प्रशासनाच्या रडारवर!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2026
in कारवाई, जळगाव, ब्रेकिंग
जळगावातील डॉक्टर PC-PNDT च्या रडारवर!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने गर्भलिंग निदान आणि त्यानंतर होणाऱ्या गर्भपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्भलिंग निदान करून मुलगा असल्यास गर्भ ठेवला जातो, तर मुलगी असल्यास गर्भपात केला जात असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने गर्भलिंग निदानावर कायदेशीर बंदी घातली आहे. गर्भलिंग निदान करणे किंवा त्यासाठी मदत करणे हा कायद्याने गुन्हा असून, दोषींवर शिक्षेची तरतूद आहे.

 

मात्र, असे असतानाही जळगाव शहरात गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना ऊत आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही प्रकरणांची दखल घेत कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई करून सोनोग्राफी मशीन सील करण्यात आली होती. तसेच, शहरातील काही रुग्णालयांमधील डॉक्टरांना सोनोग्राफीचा वापर आणि गर्भलिंग निदानासंदर्भात PC-PNDT विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ताकीद देण्यात आल्याचे समजते.

 

दरम्यान, जळगाव शहरातील काही डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्रे PC-PNDT विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आगामी काळात आणखी काही ठिकाणी तपासणी अथवा कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. गर्भलिंग निदानासारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने नियमित तपासणी, नोंदणी कागदपत्रांची पडताळणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: #PCPNDT#गर्भपात#गर्भलिंगनिदानजळगावडॉक्टर
Previous Post

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास!

Next Post

पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif