• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home नागपूर

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास!

जैन इरिगेशनला २३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश; २०१४ मधील धनादेश अनादर प्रकरणाचा निकाल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2026
in नागपूर, न्यायालयीन बातम्या
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव/नागपूर – जैन इरिगेशनला उधारीपोटी दिलेला सुमारे १९ लाख ८८ हजार ८८५ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी नागपूर येथील रोशन एग्रो सेंटरच्या संचालिका जयश्री पुरुषोत्तम बावीस्कर यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याबरोबरच संबंधित जैन इरिगेशन कंपनीस २३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जयश्री बावीस्कर यांनी सन २०१४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीकडून घेतलेल्या उधारीच्या व्यवहारापोटी सुमारे रूपये १९,८८,८८५ रकमेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश कंपनीने बँकेत सादर केला असता तो अनादरित होऊन परत आला. त्यानंतर कंपनीने संबंधित व्यक्तीविरुद्ध न्यायालयात फौजदारी प्रकरण क्र. ४८६५/२०१४ दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायालयाने निकाल देत आरोपीस दोषी ठरविले. धनादेश हा उधारीच्या व्यवहारापोटी देण्यात आला असल्याचे कंपनीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच धनादेशाच्या रकमेपेक्षा अधिक म्हणजे २३ लाख रुपये नुकसानभरपाई कंपनीस अदा करण्याचे आदेश दिले. सदर प्रकरणात कंपनीच्या वतीने अॅड. निशांत अत्रे यांनी काम पाहिले, तर आरोपीच्या वतीने अॅड. सतीश सी. पाटील यांनी बाजू मांडली.

या निकालामुळे धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, उधारीच्या व्यवहारात दिलेल्या धनादेशाचा अनादर झाल्यास त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: चेक बाऊन्सजयश्री बावीस्करजैन इरिगेशनधनादेश अनादरनागपूर न्यायालयरोशन एग्रो सेंटर
Previous Post

रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा!

Next Post

जळगावातील डॉक्टर PC-PNDT च्या रडारवर!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावातील डॉक्टर PC-PNDT च्या रडारवर!

जळगावातील डॉक्टर PC-PNDT च्या रडारवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif