• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना!

जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2026
in जळगाव, आरोग्य
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘रक्तदान हाच खरा आत्मसन्मान’ या उपक्रमाद्वारे परिवारातील सदस्य व कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेत रक्तदानाचा पायंडा कायम ठेवला. कंपनीतील सर्व सहकाऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने स्नेह ठेवणाऱ्या कांताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वांच्या मनात निःसीम आदर आहे. या कृतज्ञतेतून उत्स्फूर्तपणे यावर्षी ४८० सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

समाजातील गरजू व्यक्तींना रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ६ सप्टेंबर रोजी कंपनीत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. अशाच पद्धतीचे रक्तदान शिबिर स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनी ९ मार्चला देखील करण्यात येते. यातदेखील सहकारी उत्स्फूर्त सहभागी होतात. सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत चाललेले हे महारक्तदान शिबिराचे आयोजन भारतभरातील कंपनीच्या प्रमुख आस्थापनांमध्ये करण्यात आले होते. यात टी.सी. पार्क व जैन प्लास्टिक पार्क येथे ३०७, जैन ॲग्री पार्क, एनर्जी पार्क, फूड पार्क, डिव्हाईन पार्क मिळून १४९, चित्तूर ०९, उदमलपेठ ०७, अलवर ०२, हैदराबाद ०६ अशा ४८० सहकाऱ्यांनी रक्तदान केले.

जैन फूड पार्क येथील ॲडमिन ऑफिसच्या सभागृहात व प्लास्टिक पार्क येथे डेमो बिल्डिंग हॉलमध्ये स्व. कांताबाई जैन यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.

प्लास्टिक पार्क येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन मिलिंद खारुल, जनमेजय नेमाडे, किशोर सोनार, सी. एस. नाईक तसेच सिव्हिल विभागाच्या डॉ. श्वेता वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस रक्तपेढीने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. त्यात डॉ. शंकरलाल सोनवणे, डॉ. उल्हास तासखेडकर, मंगलाबाई ठोमरे यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

जैन फूड पार्क येथे सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. कल्याणी नागुलकर आणि वरिष्ठ सहकारी सुनील गुप्ता, संजय पारख, जी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तसंकलनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी आदी संस्थांनी रक्तसंकलन केले.

सहकाऱ्यांची कंपनीप्रती असलेली आस्था व स्व. कांताईंच्याप्रती असलेली श्रद्धा याचे हे महारक्तदान शिबिर द्योतक आहे. सहकाऱ्यांचे यासाठी असलेले योगदान कंपनीची सामाजिक बांधिलकी दृढ करणारे आहे, अशा शब्दांत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बातमी शेअर करा !
Tags: कांताबाई जैनजळगावजैन इरिगेशनभवरलालजी जैनरक्तदान शिबिररक्तदान हाच खरा आत्मसन्मान
Previous Post

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

Next Post

रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा!

रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif