• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

शेळगाव बॅरेज येथे मासेमारीसाठी गेलेला सिराज टेलर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला; सोमवारी पुन्हा शोधमोहीम राबविणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 6, 2026
in क्राईम
शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य न्यूज नेटवर्क 

यावल : शेळगाव बॅरेज येथील तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेला नशिराबाद (ता. जळगाव) येथील तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. सिराज टेलर असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून, सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील सिराज टेलर हे अन्सार शेख यांच्यासोबत रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शेळगाव बॅरेज परिसरात मासेमारीसाठी गेले होते. तापी नदीपात्राच्या उत्तरेकडील भागात मासेमारी करत असताना सिराज टेलर हे पाण्यात उतरले.

पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात बुडाले. त्याचवेळी बॅरेजमधून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. हा प्रकार उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती अन्सार शेख यांनी नशिराबाद येथे दिल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर सिराज टेलर यांचा तापी नदीपात्रात शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

सायंकाळपर्यंत नदीपात्रात तसेच परिसरात शोध घेण्यात आला; मात्र सिराज टेलर यांचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सिराज टेलर यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #तरुण#तापीनदी#यावल#वाहूनगेलाशेळगाव बॅरेज
Previous Post

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

September 6, 2026
गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif