• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कावड यात्रेत काळाचा घाला! १० वर्षीय प्रबलचा अपघाती मृत्यू; संतप्त जमावाकडून आयशर पेटवला

जळगाव-ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ दुर्घटना; रस्ता रोखून नातेवाईकांचा आक्रोश, पोलिसांशी धक्काबुक्की

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 24, 2026
in जळगाव, Uncategorized, क्राईम
कावड यात्रेत काळाचा घाला! १० वर्षीय प्रबलचा अपघाती मृत्यू; संतप्त जमावाकडून आयशर पेटवला
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच जळगाव-ममुराबाद रस्त्यावर सोमवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. म्हाळसादेवी मंदिराजवळ कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी या मुलाला आयशर वाहनाने धडक दिली. या दुर्घटनेत प्रबलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. यात्रा पूर्ण करून भाविक परतीच्या मार्गावर असताना जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या MH-20-EG-3593 क्रमांकाच्या आयशर वाहनाची प्रबलला धडक बसली. धडकेनंतर मुलाला वाहनाने काही अंतर ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच प्रबलचे नातेवाईक आणि नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समोर येताच कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकाला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. चालकावर कारवाई होईपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू नये, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.

परिस्थिती चिघळत असतानाच संतप्त जमावाकडून अपघातग्रस्त आयशर वाहनाला आग लावण्यात आली. वाहन किराणा मालाने भरलेले असल्याने आगीचे लोळ उठले आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. जमावाला शांत करण्याच्या प्रयत्नांदरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सायंकाळी सुमारे पाच वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला.

दरम्यान, पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रबलच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

कावड यात्रेच्या भक्तिमय वातावरणात अचानक घडलेल्या या दुर्घटनेने आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले असून, १० वर्षीय प्रबलच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अपघातआयशरकावड यात्राजळगावप्रबल गवळीममुराबाद
Previous Post

‘स्वच्छता’ संस्कारांची शाळा ठरली परिवर्तनाची प्रयोगशाळा! आदर्श गुरुकुल राज्यात प्रथम

Next Post

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन - कवि किरण येले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif