• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी साकारले अत्याधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्र

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 13, 2026
in जळगाव, Uncategorized, उद्घाटन
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात विकास डेअरीच्या ५५ वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीत गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ हा दिवस निश्चितच ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरणार आहे. जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या संस्थेच्या इतिहासात या दिवशी एका नव्या सुवर्ण अध्यायाची भर पडणार आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक-दृष्टे कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांचे भव्य स्मारक, अत्याधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्र तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण व क्षमता वाढ अशा तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण होत आहे.

 

या तीनही प्रकल्पांकडे केवळ विकासकामे म्हणून पाहता येणार नाही. एका बाजूला दूध संघाची पायाभरणी करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन आहे, तर दुसऱ्या बाजूला भविष्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाचे ज्ञान देण्याची भक्कम पायाभरणी आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आणि जबाबदार औद्योगिक व्यवस्थापनाच्या दिशेनेही दूध संघाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

 

दूरदृष्टी असलेल्या जे. टी. महाजन यांच्या विचारांचा वारसा

जळगाव जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असतानाही १९७० च्या दशकात जिल्ह्यातील दूध योग्य पद्धतीने संकलित, प्रक्रिया आणि विपणन करण्याची सक्षम व्यवस्था नव्हती. परिणामी जिल्ह्यातील दूध बाहेर जात होते आणि त्याचा मोठा आर्थिक फायदा व्यापाऱ्यांना होत होता. शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य त्यांना मिळावे, दूध उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्यातच दूध प्रक्रिया उद्योग उभा राहावा, ही गरज ओळखून माजी गृहराज्यमंत्री कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांनी १९७१ मध्ये जिल्हा सहकारी दूध संघाची पायाभरणी केली.त्या काळात घेतलेला हा निर्णय आजच्या काळात पाहिला तर त्यांच्या दूरदृष्टीची खरी जाणीव होते. एका संस्थेची स्थापना करून थांबण्याऐवजी त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग तयार केला. आज हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी विकास डेअरीचे नाते जोडले गेले आहे. जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना या सहकारी व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्या दूध उत्पादनाला बाजारपेठ आणि आर्थिक आधार मिळत आहे. म्हणूनच जे. टी. महाजन यांचे स्मारक हे केवळ दगड-विटांचे स्मारक नसून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या एका महान विचाराचे स्मारक आहे. सहकारातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता येते, हा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारी ही प्रेरणास्थळ ठरणार आहे.

 

वर्षभरात साकारले स्मारक; कृतज्ञतेचे भावपूर्ण अभिवादन

गतवर्षी झालेल्या दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक कै. जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे त्या निर्णयानंतर अवघ्या वर्षभराच्या कालावधीत भव्य स्मारक उभारून त्यांचे स्मरण चिरंतन करण्याचे काम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. संस्थेची स्थापना करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचे स्मरण केवळ जयंती किंवा पुण्यतिथीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच खरी आदरांजली आहे. या भावनेतून उभारण्यात आलेले हे स्मारक दूध संघात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा देईल. सहकाराची ताकद, शेतकऱ्यांच्या एकजुटीचे महत्त्व आणि दूरदृष्टीच्या निर्णयांची ताकद यांची आठवण करून देणारे हे स्मारक ठरणार आहे.

 

शेतकरी प्रशिक्षण केंद्रातून आधुनिक दुग्ध व्यवसायाचे धडे

 

दूध उत्पादन क्षेत्रात काळानुरूप मोठे बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने पशुपालन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जनावरांचे शास्त्रीय व्यवस्थापन, संतुलित पशुखाद्य, दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती, पशू आरोग्य, प्रजनन व्यवस्थापन आणि स्वच्छ दूध उत्पादन याबाबत शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज ओळखून अनेक वर्षांपासून बंद आणि मोडकळीस आलेल्या जुन्या प्रशिक्षण केंद्राचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दूध उत्पादक आणि पशुपालक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत.

आजचा शेतकरी केवळ दूध उत्पादक न राहता आधुनिक पशुपालक आणि उद्योजक बनला पाहिजे, ही काळाची गरज आहे. जनावरांचे योग्य व्यवस्थापन, त्यांच्या आरोग्याची काळजी, गुणवत्तापूर्ण पशुखाद्याचा वापर, दूध उत्पादनातील गुणवत्ता आणि खर्चाचे शास्त्रीय नियोजन या सर्व बाबींचे प्रशिक्षण मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होऊ शकते. त्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र केवळ प्रशिक्षण देणारी वास्तू न राहता जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचे आणि मार्गदर्शनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे.

 

पर्यावरण संरक्षणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण

 

दूध संघाचा विस्तार होत असताना परिसरात नागरी वस्तीही वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योगाचा विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन दूध संघाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून त्याची क्षमता देखील वाढविण्यात आली आहे.आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पामुळे सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यास मदत होणार आहे. दूध संघाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही जबाबदार व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने करण्यात आलेली ही क्षमता वाढ महत्त्वपूर्ण आहे.0विकास करताना पर्यावरणाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित होतो.

 

‘विकास’ ब्रँडने निर्माण केला विश्वास

५५ वर्षांच्या प्रवासात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने केवळ दूध संकलन आणि विक्रीपुरते आपले कार्य मर्यादित ठेवले नाही. ‘विकास’ या नावाने दर्जेदार आणि विविध दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवून या ब्रँडने ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

दूध, दही, श्रीखंड, तूप, पनीर, सुगंधी दूध, ताक, बर्फी यांसह १८ हून अधिक विविध उत्पादनांच्या माध्यमातून ‘विकास’ ब्रँडची व्याप्ती वाढत आहे. दर्जा, चव आणि विश्वास या त्रिसूत्रीवर उभ्या राहिलेल्या या ब्रँडला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दूध संघासाठी हा केवळ व्यवसायाचा विषय नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्या माध्यमातून सहकाराची आर्थिक साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.

 

शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी ‘फर्टिलिटी फीड’चा उपक्रम

दूध उत्पादन वाढविण्यासाठी केवळ चांगल्या जातीची जनावरे असणे पुरेसे नाही, तर त्यांचे योग्य पोषण, आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा जनावरे गाभण न राहणे ही पशुपालक शेतकऱ्यांसमोरील मोठी अडचण ठरते. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर आणि शेतकऱ्याच्या अर्थकारणावर होतो.

ही बाब लक्षात घेऊन दूध संघामार्फत पशुखाद्यासोबतच गाभण न राहणाऱ्या जनावरांसाठी ‘फर्टिलिटी फीड’ची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून तयार करण्यात आलेला हा उपक्रम पशुपालकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणारा आहे. दूध संघाचा केंद्रबिंदू हा केवळ ग्राहक नसून दूध उत्पादक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा हा प्रयत्न सहकाराच्या मूळ उद्देशाला अधिक बळकटी देणारा आहे.

 

५५ वर्षांची परंपरा आणि आधुनिकतेकडे वाटचाल

विकास डेअरीने गेल्या ५५ वर्षांत अनेक चढ-उतार अनुभवले. बदलत्या काळानुसार दूध व्यवसायाचे स्वरूप बदलले, ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या, तंत्रज्ञान बदलले आणि बाजारपेठेतील स्पर्धाही वाढली. मात्र या सर्व बदलांमध्ये दूध संघाने आपली शेतकरीकेंद्रित भूमिका कायम ठेवली.

आज संस्थापकांच्या विचारांचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे. त्याच दिशेने स्मारक, अत्याधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे तीनही उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. एका बाजूला इतिहासाचा सन्मान, दुसऱ्या बाजूला वर्तमानातील गरजांची पूर्तता आणि तिसऱ्या बाजूला भविष्यातील आव्हानांसाठी तयारी, अशी या तीन उपक्रमांची व्यापक सांगड घातली गेली आहे.

 

नव्या पिढीच्या शेतकऱ्यांसाठी नवी दिशा

आज ग्रामीण अर्थव्यवस्थेत दुग्ध व्यवसायाचे महत्त्व मोठे आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी कुटुंबाला नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अधिक शास्त्रीय, आधुनिक आणि नफ्याचा करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ज्ञान व तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. दूध संघाच्या नव्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना केवळ दूध विक्रीची सुविधा मिळणार नाही, तर पशुपालनातील आधुनिक पद्धती शिकण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. हीच प्रक्रिया पुढे नेण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

 

कार्यक्षम व्यवस्थापनातून प्रगतीची नवी वाट

 

चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाखाली जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ ५५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला आधुनिकतेची जोड देत पुढे जात आहे. संस्थेच्या मूलभूत सहकारी विचारांना कायम ठेवत बदलत्या काळानुसार नवे उपक्रम स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून संस्थेची आर्थिक क्षमता वाढविणे, उत्पादनांची गुणवत्ता टिकविणे, बाजारपेठ विस्तारण्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालनाचे प्रशिक्षण देणे आणि पर्यावरणपूरक व्यवस्था निर्माण करणे, या सर्व दिशांनी दूध संघाची वाटचाल सुरू आहे. १३ ऑगस्टचा हा ऐतिहासिक दिवस त्यामुळे केवळ तीन प्रकल्पांच्या लोकार्पणाचा दिवस नाही. तो संस्थापक कै. जे. टी. महाजन यांच्या दूरदृष्टीला अभिवादन करण्याचा, ५५ वर्षांच्या सहकारी वाटचालीचा गौरव करण्याचा आणि पुढील पिढीच्या शेतकऱ्यांसाठी अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत दुग्ध व्यवसायाची पायाभरणी करण्याचा दिवस आहे.

कै. जे. टी. महाजन यांनी १९७१ मध्ये पेटवलेली सहकाराची ज्योत आज ५५ वर्षांनंतर अधिक तेजाने प्रज्वलित झाली आहे. संस्थापकांचे स्मारक या इतिहासाची साक्ष देत राहील, शेतकरी प्रशिक्षण केंद्र नव्या पिढीला ज्ञानाची दिशा देईल आणि आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अधोरेखित करेल. हीच ५५ वर्षांच्या विकास डेअरीच्या प्रवासाची खरी ओळख आणि पुढील सुवर्ण पर्वाची नांदी आहे.

-अरविंद देशमुख

(संचालक, जिल्हा सहकारी दूध संघ, जळगाव)

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव जिल्हा सहकारी दूध संघजे टी महाजनदादासाहेब जे. टी. महाजनदूध उत्पादक शेतकरीविकास डेअरी जळगावशेतकरी प्रशिक्षण केंद्र
Previous Post

Next Post

रावेरला प्रथमच झाला रोजगार मेळावा ; ४५ उमेदवारांची झाली निवड!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रावेरला प्रथमच झाला रोजगार मेळावा ; ४५ उमेदवारांची झाली निवड!

रावेरला प्रथमच झाला रोजगार मेळावा ; ४५ उमेदवारांची झाली निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif