• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव विधान परिषद मतदानाला सुरुवात; सकाळी 10:30 वाजेपर्यंत 65 टक्के मतदारांनी बजावला हक्क

जळगाव स्थानिक प्राधिकार मतदारसंघात उत्साहात मतदान; सकाळीच 60-65% मतदानाची नोंद

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 18, 2026
in जळगाव, Uncategorized, निवडणूक, विधान परिषद निवडणूक - 2026
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकार मतदार संघ निवडणूक 2026 साठी आज, गुरुवार दि. 18 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध 7 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर सकाळी 10:30 वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालय येथील मतदान केंद्रावर 65टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

या निवडणुकीसाठी एकूण 630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये 315 पुरुष व 315 महिला मतदारांचा समावेश आहे. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती दिसून येत आहे.

मतदानासाठी जिल्ह्यात पुढील सात केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे :

तहसीलदार अमळनेर यांचे दालन

नगर परिषद फैजपूर यांचे सभागृह

उपविभागीय अधिकारी भुसावळ यांचे जुने दालन

तहसीलदार जळगाव यांचे दालन

कर्मवीर अभ्यासिका, नगर परिषद एरंडोल

तहसीलदार पाचोरा यांचे दालन

तहसीलदार चाळीसगाव यांचे दालन

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने पुरविलेले मतदान ओळखपत्र अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेले ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

मतदानाची प्रक्रिया गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेद्वारे पार पडत असून मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम द्यावा लागत आहे. मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने पुरविलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करण्यात येत आहे.

मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून मोबाईल फोन, कॅमेरा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांना केंद्रामध्ये बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील अल्पबचत भवनातील सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातम्यानिवडणूक आयोगमतदान अपडेटमहाराष्ट्र राजकारणविधान परिषद निवडणूक 2026स्थानिक प्राधिकार मतदारसंघ
Previous Post

जळगावकरांसाठी दिलासादायक आरोग्य सुविधा

Next Post

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif