• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एक्सल तुटला अन् ४०७ पलटी ; कानळदा रोडवरील अपघातात १९ जण जखमी

सत्संगासाठी मध्य प्रदेशकडे निघालेल्या आदिवासी बांधवांवर संकट; एक्सल तुटल्याने वाहन दोनदा पलटी, महिला आणि लहान मुलांचाही समावेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 25, 2026
in जळगाव, Uncategorized, अपघात
एक्सल तुटला अन् ४०७ पलटी ; कानळदा रोडवरील अपघातात १९ जण जखमी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव: मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रवासाला अपघाताचे गालबोट लागले. जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवर बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ ४०७ मालवाहू वाहनाचा मागील चाकाचा एक्सल अचानक तुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन दोन वेळा पलटी झाले. या दुर्घटनेत लहान मुलांसह १९ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली.

सत्संगासाठी जात असताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात होणाऱ्या सत्संग कार्यक्रमासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास सुरू केला होता. ममुराबाद रोडमार्गे चोपडा आणि त्यानंतर मध्य प्रदेशाच्या दिशेने जात असताना कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल अचानक तुटला.

वाहनाचा एक्सल तुटताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर दोन वेळा पलटी झाले. या घटनेमुळे वाहनातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. वाहनात सुमारे २० ते २५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, मालवाहू वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

महिला आणि लहान मुलांचाही समावेश

अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासकीय रुग्णवाहिकांसह खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.

जखमींची नावे

या अपघातात कमल बारेला (२५), सुरेश देवसिंग बारेला (४०), रवींद्र सिताराम मोरे (१२), प्रवीण सिताराम मोरे (११), सईती मगन मोरे (७), नवलसिंग सिताराम मोरे (२५), रूपाली सावरिया बारेला (१८), रमेश धनसिंग बारेला (२८), राजाराम बारेला (४०), रितेश खुलसिंग बारेला (२३), पवन धासीलाल बारेला (८), विजय रेमला बारेला (२२), अर्जुन राजाराम बारेला (१८), सावरिया हिम्मत बारेला (३८), गांजीलाल बारेला (३०), सचिन बन्सीलाल बारेला (१५), बन्सीलाल चिनूसिंग बारेला (५५), सुनील दरबार बारेला (१५) आणि अजय गुडिया बारेला (१५) हे १९ जण जखमी झाले आहेत.

अपघाताच्या कारणांचा तपास अपेक्षित

सत्संगासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या वाहनाला झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, वाहनाची तांत्रिक स्थिती, प्रवासी वाहतुकीचे नियम पाळले गेले होते का आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नव्हती.

बातमी शेअर करा !
Tags: १९ जण जखमी४०७ वाहन अपघातआदिवासी बांधवकानळदा रोडजळगाव अपघातजळगाव न्यूज
Previous Post

‘वोट बचाओ – देश बचाओ’ अभियानासाठी काँग्रेसची तयारी; जळगावात नियोजन बैठक संपन्न!

Next Post

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif