• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कानळदा येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण कला, लाठी-काठी, दांडपट्टा आणि योगाचा अंगीकार करावा, यासाठी धर्मवीर फाऊंडेशन व लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 23, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :धर्मवीर फाऊंडेशन जळगाव, आणि लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव (एमएसडब्ल्यू)द्वितीय वर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कानळदा येथील आदर्श विद्यालय व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लाठी-काठी, दांडपट्टा व योग प्रात्यक्षिकांचा विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आजच्या डिजिटल युगात तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असून त्यांना या व्यसनापासून परावृत्त करणे, त्यांच्यात मैदानी खेळ, धैर्य, शौर्य कला आणि योगाची आवड निर्माण करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाच्या क्षेत्रकार्य ग्रुपतर्फे (कानळदा) आयोजित या उपक्रमात धर्मवीर शिवकालीन आखाडा व व्यायामशाळा, तसेच धर्मवीर आखाडा (फैजपूर-यावल) यांच्या टीमने सहभाग घेतला.

यावेळी आखाड्याच्या खेळाडूंनी लाठी, काठी आणि दांडपट्टा फिरवण्याची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. सोबतच योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून दैनंदिन जीवनात आरोग्य व स्वसंरक्षणाचे काय महत्त्व आहे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शस्त्र आणि स्वसंरक्षण कला आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमास आदर्श महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, धर्मवीर फाऊंडेशन अध्यक्ष मिलन वाघोदेकर व धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष:- महेश वाघोदेकर व त्यांची टीम, तसेच एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी लीना भोवर, श्रुती चौधरी, अस्मिता भोये व जगन उदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपस्थितांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: कानळदादांडपट्टा प्रात्यक्षिकेधर्मवीर फाऊंडेशनलाठी-काठी प्रात्यक्षिकेलोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालयस्वसंरक्षण प्रशिक्षण
Previous Post

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

Next Post

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

October 23, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

October 23, 2026

कानळदा येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

October 23, 2026
खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 22, 2026
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif