• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जागतिक हृदय दिनानिमित्त हार्ट प्लस हॉस्पिटलतर्फे आयोजित विशेष हृदय तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावातील शिबिरात ६५ नागरिकांची हृदय तपासणी; तरुणांचाही उत्स्फूर्त सहभाग, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील उपचाराची प्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 30, 2026
in जळगाव, Uncategorized, आरोग्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून हार्ट प्लस हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात 65 नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली. यात जळगाव जिल्हा, नेपानगर, ब्रह्मपूर येथील नागरिकांचा ही समावेश होता.

नागरिकांना हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूक करणे, हृदय विकाराचा धोका ओळखून तो टाळता यावा, दैनंदिन जीवनात वावरत असताना शरीराच्या लहान – लहान लक्षणांकडे दुर्लक्ष न करता हृदयाच्या नियमित तपासणी करण्यावर भर देणे या उद्देशाने हार्ट प्लस हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध इंटरवेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप भारुडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या शिबिरात प्रत्येक नागरिकांचा बी पी., हृदयाचे ठोके (पल्स), ऑक्सिजनची पातळी,

इ. सी.जी.,टूडी इको, या हृदयाशी संबंधित महत्त्वपूर्ण तपासण्या सोबतच लिपिड प्रोफाइल, HBA1C, आणि शुगर इत्यादी रक्ताच्या तपासण्या ही करण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाला रिपोर्ट पाहून व्यक्तिगत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात अँजिओग्राफीची गरज आढळून आलेल्या सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजने अंतर्गत उपचार करून देण्यासाठी पुढील प्रक्रिया ही करण्यात आली.

या शिबिराचे वैशिष्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत अनेक तरुणांनी देखील तपासणी करून घेत हृदय विकाराबाबत सजगता वाढत असल्याचे दाखवून दिले. शिबिरासाठी आलेल्या सर्व नागरिक, सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी चहा- पाण्याची व्यवस्था ही हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली होती.

हार्ट प्लस हॉस्पिटलने अत्यल्प सेवाशुल्कात घेतलेल्या या उपक्रमासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

भविष्यात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात करून हृदय विकाराबाबत नागरिकांना जागरूक करण्यात येणार असल्याचे मनोगत डॉ. संदीप भारुडे यांनी व्यक्त केले.

 

फोकस कीवर्ड :

हार्ट प्लस हॉस्पिटल जळगाव हृदय तपासणी शिबिर

टॅग्स :

हार्ट प्लस हॉस्पिटल

जळगाव

हृदय तपासणी शिबिर

जागतिक हृदय दिन

डॉ. संदीप भारुडे

हृदयरोग

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजागतिक हृदय दिनडॉ. संदीप भारुडेहार्ट प्लस हॉस्पिटलहृदय तपासणी शिबिरहृदयरोग
Previous Post

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

Next Post

चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर…

चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif