• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home विकासकामे

चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर…

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 2, 2026
in विकासकामे, चाळीसगाव
चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव : चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे सर्व सोयी-सुविधायुक्त नवीन खुले जिल्हा कारागृह स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. हे खुले जिल्हा कारागृह चाळीसगाव शहराजवळील बिलाखेड शिवारात होणार असून राज्यातील मोजक्या खुल्या कारागृहांपैकी हे एक कारागृह असणार आहे.

या मंजुरीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी १५ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन चाळीसगाव येथे कारागृह मंजूर करण्याची मागणी केली होती त्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.

जळगाव जिल्हा कारागृहावर क्षमतेपेक्षा अधिक बंदींचा ताण

जळगाव शहरात १९६२ पासून २७४ बंदी क्षमतेचे जिल्हा कारागृह अस्तित्वात आहे. मात्र, ३१ जुलै २०२६ रोजीच्या स्थितीनुसार या कारागृहात प्रत्यक्षात ४७४ बंदी बंदिस्त असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच कारागृहाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक बंदी येथे ठेवण्यात येत असल्याने जळगाव जिल्हा कारागृहावर मोठा ताण निर्माण झाला होता.

या अतिरिक्त बंदीसंख्येमुळे कारागृह व्यवस्थापनावर ताण येण्याबरोबरच बंदींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आव्हाने निर्माण होत होती. राज्यातील कारागृहांमधील अतिगर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन खुले कारागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिलाखेड शिवारातील जागा कारागृहासाठी योग्य

चाळीसगाव येथील बिलाखेड शिवारातील प्रस्तावित जागेची राज्याचे कारागृहे व सुधारसेवा, महासंचालक यांनी स्थळपाहणी केली होती. तद्नंतर त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला.

या अहवालानुसार चाळीसगाव येथे नवीन कारागृहासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून, सदर जागेच्या परिसरात शासकीय रुग्णालय तसेच न्यायालयीन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी पोहोचण्यासाठी आवश्यक वाहतूक सुविधाही उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन कारागृह उभारणे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा अभिप्राय महासंचालक, कारागृहे व सुधारसेवा यांनी शासनास दिला होता.

३०० बंदी क्षमतेचे सर्व सुविधायुक्त खुले कारागृह

चाळीसगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या खुल्या कारागृहात बंदी बॅरेक, अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने तसेच इतर सर्व आवश्यक सोयी-सुविधांसह ३०० बंदी क्षमतेचे कारागृह उभारले जाणार आहे.

विशेष म्हणजे या कारागृहाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत करण्यात येणार आहे.

चाळीसगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

जळगाव जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा कारागृहानंतर चाळीसगाव येथे होणारे हे जिल्ह्यातील दुसरे कारागृह ठरणार आहे. तसेच खुले कारागृहाची सुविधा चाळीसगावात उपलब्ध होत असल्याने शहराची ओळख राज्याच्या पातळीवर आणखी अधोरेखित होणार आहे.

प्रस्तावित खुले कारागृह आणि लगतच्या परिसरात प्रस्तावित असलेली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत यामुळे भविष्यात कारागृह प्रशासन आणि न्यायालयीन व्यवस्थेतील समन्वय अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून व्यवस्थापनाचा वेळही वाचणार आहे.

जिल्हास्तरीय सुविधांच्या केंद्रस्थानी चाळीसगाव

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून यापूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय यांसारख्या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय सुविधा चाळीसगावात मंजूर झाल्या आहेत. आता खुल्या कारागृहाची भर पडल्याने चाळीसगावमध्ये जिल्हास्तरीय प्रशासकीय, न्यायिक आणि इतर महत्त्वाच्या सुविधा सातत्याने उपलब्ध होत आहेत.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजे पाटील, कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक सुहास वारके यांचे आभार मानले आहेत.

चाळीसगावच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असून, जिल्हास्तरीय सुविधांचे केंद्र म्हणून चाळीसगावची वाटचाल अधिक मजबूत करणारे हे आणखी एक पाऊल ठरणार आहे.

नवराज्यने यापूर्वी झळकवली होते कारागृहाच्या समस्येची बातमी 

गेल्या वर्षी नवराज्यने या कारागृहाची बातमी झळकवली होती  होती. मात्र जळगाव नवीन कारागृहाची निर्मिती झाली नसली तरी, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे या कारागृहाची निर्मिती होणार आहे.त्यामुळे जिल्हा कारागृह पडणार अधिकचा दान आता कमी होणार आहे. उशिरा का होईना नवराज्यची दखल घेतली याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचे नवराज्य लाईव्ह चे   चिप एडिटर योगेश सुने यांनी दिले धन्यवाद!

बातमी शेअर करा !
Tags: आमदार मंगेश चव्हाणचाळीसगाव कारागृहचाळीसगाव खुले कारागृहचाळीसगाव न्यूजजळगाव न्यूजबिलाखेड शिवार
Previous Post

जागतिक हृदय दिनानिमित्त हार्ट प्लस हॉस्पिटलतर्फे आयोजित विशेष हृदय तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif