• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

केळीच्या खोडापासून सलग दुसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक मूर्ती; डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांवर आगमन-विसर्जन मिरवणूक, २५ वर्षांपासून समाजप्रबोधन व सामाजिक उपक्रमांची परंपरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 25, 2026
in जळगाव, Uncategorized, गणेशोत्सव
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : स्नेहल प्रतिष्ठान या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून पारंपरिक, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘॥ पिंप्राळ्याचा राजा ॥’ म्हणून जळगाव शहरात या मंडळाची ओळख आहे. जळगाव शहरातील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेला पिंप्राळा उपनगराशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणून स्नेहल प्रतिष्ठानकडे पाहिले जाते. अजिंक्य कमलाकर देसाई स्थापनेपासून या मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

समाजप्रबोधनासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे भान जपत मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती साकारली आहे. ठाकूर ब्रदर्स यांच्या हस्ते ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.

विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील घटक माशांसाठी खाद्यरूपात उपलब्ध होत असल्याने पाण्याचे प्रदूषण टाळण्यास मदत होते. श्रींच्या मूर्तीचे विसर्जन भावभक्तीने आणि सनातन परंपरेनुसार व्हावे, तसेच विसर्जनानंतर मूर्तीची अवहेलना होऊ नये आणि निसर्गालाही कोणतीही हानी पोहोचू नये, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर आगमन आणि विसर्जन मिरवणूक

स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या तालावर ‘पिंप्राळ्याचा राजा’चा आगमन सोहळा आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणूक आयोजित केली जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्यात येत असल्याने गणेशोत्सव आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग असतो.

२५ वर्षांपासून समाजप्रबोधन आणि सामाजिक उपक्रम

गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधनात्मक कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वारकरी संप्रदायातील नामवंत ७७ कीर्तनकारांची कीर्तने या कालावधीत आयोजित करण्यात आली आहेत. तसेच कीर्तन महोत्सवादरम्यान सेवा देणाऱ्या विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी सहकार्य केले जाते.

प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. हिवाळ्यात ब्लँकेटचे तर दिवाळीच्या काळात गरजूंना फराळ आणि मिठाईचे वाटपही करण्यात येते.

याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सातत्याने सहभाग राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवातही भक्ती, परंपरा, समाजप्रबोधन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: केळीच्या खोडाची गणेशमूर्तीगणेशोत्सव २०२६जळगाव गणेशोत्सवपर्यावरणपूरक गणेशमूर्तीपिंप्राळ्याचा राजास्नेहल प्रतिष्ठान
Previous Post

केसीई शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

Next Post

स्मार्ट सर्व्हिसच्या या आडमुठ धोरणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्मार्ट सर्व्हिसच्या या आडमुठ धोरणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

स्मार्ट सर्व्हिसच्या या आडमुठ धोरणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif