नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई.सोसायटी च्या वर्धापन दिनानिमित्त शालेय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक वैभव मावळे ( मु. जे.महाविद्यालय नाट्य विभाग प्रमुख) , ज्येष्ठ रंगकर्मी तसेच स्पर्धेचे परीक्षक धनंजय राजहंस , मंजिरी राजहंस , शाळेच्या मुख्या.धनश्री फालक, मुख्या.प्रणिता , झांबरे ,एकनाथ पाचपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा प्राथमिक ,उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक अशा तीन गटांमध्ये संपन्न झाली . त्यात डी.जे.चा भस्मासुर , मी प्लास्टिक बोलते , हिरकणी , माझे आभाळ माझे पंख , कंटाळा आलाय , शेतातली न्याहारी , मी गंगू , विसरभोळी गोदा , फुलराणी , मूषक राज आधी विषयांवर सुंदर अशा नाट्यछटा सादर करण्यात आल्या. त्यात
गट पहिला (इयत्ता ३ री व ४ थी)
कु. आराध्या गणेश पाटील (प्रथम), गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय
कु. मेघना सुनील शिंदे (द्वितीय) शा.ल खडके प्राथमिक विद्यामंदिर
कु. इशिका शरीफ तडवी (तृतीय), बालनिकेतन विद्यामंदिर
कु. नित्या शुक्ला (उत्तेजनार्थ १), अविनाश आचार्य विद्यालय
कु. प्रेषिता नंदकिशोर ढोले (उत्तेजनार्थ २) ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल
गट दुसरा (इयत्ता ५ वी ते ७ वी)
कु. डिंपल दीपक सपके (प्रथम), प. न. लुंकड कन्या शाळा
कु. अनुश्री अनिल चौधरी (द्वितीय), ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय
कु. काव्या राजेश बांदल (तृतीय) विद्या विकास मंदिर शाळा
कु. जिनल राहुल वायसे (उत्तेजनार्थ १), विद्या विकास मंदिर शाळा
कु. धनश्री योगेश भारुडे (उत्तेजनार्थ २) ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय
गट तिसरा (इयत्ता ८ वी ते १० वी)
कु. दर्शना संजय जगताप (प्रथम), ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय
कु. लावण्या किशोर नारखेडे (द्वितीय), नंदिनीबाई वामनगाव मुलींचे विद्यालय
कु. पूजा हेमंत भट (तृतीय) ओरियन इंग्लिश स्कूल
कु. केतकी राजेश कोरे (उत्तेजनार्थ १), प.न.लुंकड कन्या शाळा
कु. योगेश्वरी भटू सैदाणे (उत्तेजनार्थ २)प.न.लुंकड कन्या शाळा
सदर विद्यार्थ्यांना के. सी. ई.सोसायटी चे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर , ज्येष्ठ रंगकर्मी तसेच स्पर्धेचे परीक्षक धनंजय राजहंस , मंजिरी राजहंस यांच्या हस्ते रोख पारितोषिक , स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक चंद्रकांत कोळी , योगेश भालेराव , पराग राणे यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र मिरकुटे, रत्नमाला शिंदे यांनी केले. तर उपशिक्षिका भावना धांडे,पल्लवी टोके यांनी सहकार्य केले.







