• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

स्मार्ट सर्व्हिसच्या या आडमुठ धोरणामुळे रुग्णसेवा कोलमडली !

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 23, 2026
in जळगाव, आरोग्य
स्मार्ट सर्व्हिसच्या या आडमुठ धोरणामुळे रुग्णसेवा कोलमडली !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये स्मार्ट सर्व्हिस या कंत्राटदार कंपनीकडून कामगारांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याचा कालावधी उलटूनही पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन पुकारले. २३ तारीख उजाडली तरी ऑगस्ट महिन्याचे वेतन न मिळाल्याने सणासुदीच्या दिवसांत कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनानेदेखील पद्धतशीर याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही. यासंदर्भात विचारणा केली असता कंपनीचे अधिकारी असभ्य भाषेत आणि अरेरावीची भाषा वापरतात, असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केलाy आहे. याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल

सकाळी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (OPD), आंतररुग्ण विभाग (IPD) आणि आणीबाणी (इमर्जन्सी) वॉर्डातील रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली. स्ट्रेचर उपलब्ध असूनही ते ने-आण करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ व हाल झाले. परिस्थिती सावरताना डॉक्टर व परिचारिकांची मोठी कसरत झाली.

एसएमएस कंपनीची पुनर्रचना करण्याची मागणी

यापूर्वी कार्यरत असलेली ‘एसएमएस’ (SMS) कंपनी दरमहा १० ते १२ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करत होती. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने ऐनवेळी एसएमएस कंपनीचे कंत्राट रद्द करून ‘स्मार्ट सर्व्हिस’ला काम दिल्याने ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्मार्ट सर्व्हिस कंपनीबाबत गेल्या वर्षभरात अनेक तक्रारी येऊनही रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदाराला जाब विचारावा आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.

कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या

दर महिन्याच्या पहिल्या १० दिवसांच्या आत पगार देण्यात यावा.

पगार वेळेवर दिला जात नसेल तर स्मार्ट सर्व्हिसचे कंत्राट रद्द करून वर्ग-४ ची भरती पूर्ववत ‘एसएमएस’ कंपनीमार्फत करण्यात यावी.

कामगारांशी असभ्य भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

बातमी शेअर करा !
Tags: कर्मचारी आंदोलनजळगावजळगाव मेडीकल कॉलेजपगार रखडलावेतनाचा प्रश्नशासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Next Post

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

महापौरांची पाहणी : कृत्रिम तलाव निर्मितीची महापालिकेची तयारी पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif