• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावच्या के.सी. पार्कजवळ ग्लॉसी आयबिसचे दर्शन; पक्षीप्रेमींचे लक्ष वेधले

आव्हाने रोडवरील मोकळ्या परिसरात पाणपक्ष्यांची जोडी; पक्षीमित्र वासुदेव वाढे यांनी दिली माहिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 19, 2026
in जळगाव, पर्यावरण
जळगावच्या के.सी. पार्कजवळ ग्लॉसी आयबिसचे दर्शन; पक्षीप्रेमींचे लक्ष वेधले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live  न्यूज नेटवर्क 

जळगाव : शहरातील आव्हाने रोडवरील के.सी. पार्कजवळ असलेल्या मोकळ्या परिसरात ग्लॉसी आयबिस ( मोर शराटी)  अर्थात छोटा शराटी (Glossy Ibis) या पाणपक्ष्यांची जोडी पाहायला मिळाली. शहराच्या परिसरात या पक्ष्यांचे आगमन झाल्याने पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींचे लक्ष वेधले गेले आहे.

या पक्ष्याबाबतची माहिती पक्षीमित्र वासुदेव वाढे यांनी ‘नवराज्य लाईव्ह’शी बोलताना दिली.

मोर शराटी हा स्थानिक तसेच स्थलांतरित पाणपक्षी आहे. हा पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागा, तलाव आणि नदीच्या परिसरात आढळतो. मात्र, जळगाव शहरातील के.सी. पार्कजवळील मोकळ्या परिसरात या पक्ष्यांची जोडी आढळून आल्याने शहरातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

बेडूक, मासे, खेकडे हे प्रमुख खाद्य

मोर शराटीच्या आहारात बेडूक, मासे, खेकडे, गोगलगायी, नाकतोडे आणि ड्रॅगनफ्लाय यांसारख्या जलचर आणि कीटकांचा समावेश होतो. पाणथळ आणि चिखलयुक्त भागात खाद्य शोधताना हा पक्षी दिसतो.

लांब वाकलेली चोच हे प्रमुख वैशिष्ट्य

या पक्ष्याची लांबसर वाकलेली चोच हे त्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. चोचीच्या टोकावर असलेल्या संवेदनशील अवयवांच्या मदतीने तो चिखलातील जलचर स्पर्शाने शोधून काढतो.

पाणवठ्यालगतच्या झाडांवर करतो घरटे

मोर शराटी हा जंगलातील पक्षी नसून पाणवठ्याच्या जवळील झाडांवर घरटे करून राहतो. भारतभर या पक्ष्याचे अस्तित्व आढळते. स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी म्हणूनही त्याचे दर्शन होते.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या पक्ष्याला दुसऱ्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. जळगाव शहराच्या परिसरात या पक्ष्यांचे दर्शन घडल्याने स्थानिक पाणवठे, मोकळे परिसर आणि जैवविविधता जपण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: Glossy Ibisआव्हाने रोडके.सी. पार्कछोटा शराटीजळगावमोर शराटी
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा संकल्प अभियान

Next Post

केसीई शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केसीई शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

केसीई शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif