• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा संकल्प अभियान

जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्नदान व फळवाटप; गणपती महाआरतीनंतर ७५ दिवे प्रज्वलित करून वाढदिवस साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 18, 2026
in जळगाव, राजकारण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अभियानाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांना अन्नदान तसेच फळवाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर सौ. दीपमाला काळे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर सायंकाळी ७.३० वाजता जी.एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात गणपतीची महाआरती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ दिवे प्रज्वलित करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात वाढदिवसाचा उत्साह साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, कार्यक्रमाचे संयोजक दीपक परदेशी, उदयजी भालेराव यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावदीपक सूर्यवंशीनरेंद्र मोदीभाजपसुरेश भोळेसेवा संकल्प अभियान
Previous Post

जळगावात महापौर दीपमाला काळेंचा पाहणी दौरा; अस्वच्छतेवरून सफाई ठेकेदाराला झापले

Next Post

जळगावच्या के.सी. पार्कजवळ ग्लॉसी आयबिसचे दर्शन; पक्षीप्रेमींचे लक्ष वेधले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावच्या के.सी. पार्कजवळ ग्लॉसी आयबिसचे दर्शन; पक्षीप्रेमींचे लक्ष वेधले

जळगावच्या के.सी. पार्कजवळ ग्लॉसी आयबिसचे दर्शन; पक्षीप्रेमींचे लक्ष वेधले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif